17/07/26
Breaking News

परभणीत व्हाईस ऑफ मिडीयाचे मंगळवारी धरणे आंदोलन

परभणी,दि 03 (प्रतिनिधी)ः
राज्यभरात पत्रकारांवर हल्ला करण्यासह धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. या विरोधात व्हाईस ऑफ मीडियाने राज्यभर धरणे आंदोलन पुकारले आहे. याच अनुषंगाने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यात नऊ तालुक्यांचे पदाधिकारी,सदस्य सहभागी होणार आहेत अशी माहीती राज्याचे कार्याध्यक्ष श्री. विजय चोरडिया यांनी दिली.

व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यसहचिटणीस  श्री. सुरज कदम, राज्य सह संघटक श्री. विजय पाटील,जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे कार्याध्यक्ष श्री. विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी परभणीत पार पडली. या बैठकीत धरणे आंदोलनाची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना श्री विजय चोरडिया म्हणाले, राज्यभरात पत्रकारांवर हल्ले वाढत आहेत. पत्रकारांना धमकावले जात आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या विरोधात व्हाईस ऑफ मीडियाने राज्यात धरणे आंदोलन पुकारले आहे. पत्रकार सुरक्षा कायदा सन 2019 ची कठोर अंमलबजावणी करावी, पत्रकारांवरील दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अधिस्विकृतीसाठी असलेल्या अटी आणि नियम शिथिल करावेत, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी, लघु दैनिक, साप्ताहिक यांच्या जाहिराती दरात वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे अशी माहिती श्री. चोरडिया यांनी दिली. जिल्हास्तरावर हे आंदोलन होणार असून यामध्ये जिल्हा कार्यकारणी सह सर्व नऊ तालुक्यातील पदाधिकारी सदस्य सहभागी होणार आहेत, या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला मराठवाडा कार्यकारणी पदाधिकारी श्री. विशाल माने,श्री. सुरेश जंपनगिरे यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, बालासाहेब काळे, नरहरी चौधरी, राजन मंगरूळकर, मारुती जुंबडे, विजय कुलकर्णी, सुधीर बोर्डे,लक्ष्मीकांत रासवे, विष्णू सायगुंडे, दिलीप बोरुळ,ज्ञानेश्वर उंडाळ, अनिल अहिरे,रियाज कुरेशी उपस्थित होते.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …