04/02/26
Breaking News

पूर्णेत नगरपालीकेने तयार केलेल्या खड्यात बुडून बालकाचा मृत्यु

सुशीलकुमार दळवी
पुर्णा,दि 29 ः
पुर्णा नगर परिषदेकडून शहराच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडुन विश्वदीप संदीप कांबळे या दहा वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पुर्णा शहरातील हरीनगर भागात घडली
काल २८ ऑगस्ट रोजी विश्वदीप पावसात बाहेर गेला होता त्यावेळी रात्रीच्या या परिसरात खड्डा पाण्याने भरला असताना त्याचा लक्षात न आल्या मुळे तो पाण्यात पडला ही घटना राञी अकराच्या सुमारास लक्षात आली त्या पूर्वी विश्वदीप च्या आई वडीलांनी माझा मुलगा हरवला आहे अशी पुर्णा पोलीस स्टेशन ला रितसर कळवले होते सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. नगर परीषदेच्या सदरील कंत्राटदाराकडुन ही टाकी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डड्यास कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. या बाबत नागरिकांनी घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत सदरील ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोरकस पणे नागरिक करत आहेत

विश्वदीप संतोष कांबळे (वय १०) वर्ष रा. नालंदा नगर पूर्णा असं त्या मयत चिमुकल्या बालकांचे नांव आहे. सदरील बालक हा घरुन खेळण्यासाठी गेला होता. परंतु सायं ५ वाजल्यापासून तो बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी पोलीसांना कळवले होते. पोलीसांनीही ही माहिती समाज माध्यमातून प्रकाशित केली होती. विश्वदीपचा शोध घेणा-या पोलीसांना गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हरिनगर येथे पालीकेकडुन नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकी बांधकामा साठी खोदलेल्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह आढळून हे कळताच येथील
पो. नि. विलास गोबाडे, सपोनि गजानन पाटील, फौजदार प्रकाश इंगोले व आमेर चाऊस यानीं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा चोकशी केली असता तो मुलगा विश्वदीप कांबळे असल्याचे उघडकीस आले आहे. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून विश्वदीप हा पित्याचे छत्र हरवलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

….पुर्णा पालीकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा पहिला बळी……
टाकीबांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून १० वर्षीय विश्वदीप कांबळे याबालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हा प्रकार पालीकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा पहिला बळी ठरला आहे. कंत्राटदाराने काम करताना सुरक्षा उपाययोजना करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या हलगर्जीपणामुळेच निष्पाप जीव गेला असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला असून, जबाबदार पाणीपुरवठा अभियंता, ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पुर्णा पोलीस स्टेशन ला येऊन करत आहेत अद्याप पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नसुन प्रक्रिया चालु आहे असे उत्तर दिले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …