23/06/26
Breaking News

श्री शिवाजी पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये योगा दिन साजरा

परभणी,दि 22ः
परभणी येथील म. शि. प्र मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलीटेक्निक येथे 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरील योगा दिनाचेआयोजन तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ शाहिद ठेकिया केले होते
सदरील योगा दिनानिमित्ताने प्राचार्य डॉ शाहिद ठेकीया विभाग प्रमुख प्रा. रसिका चौधरी यांनी महाविद्यालयातील कर्मचारी यांच्याकडून सामूहिक वेगवेगळ्या प्रकारची योगासने करून घेतली व योगाचे महत्व सांगितले ते म्हणाले की प्रत्येकाने दररोज नियमित योगासने करावी व निरोगी शरीर हे निरोगी मनाचे वास्तव्य आहे असा मौलिक सल्ला प्राचार्य डॉ. शाहिद ठेकीया यांनी दिला योगा दिनाचे महत्व उद्देश सांगताना ते म्हणाले की मानसिक आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ति आणि निरोगी जीवनशैली बाबत समाजात जनजागृती निर्माण करणे हा या योगा दिनाचा उद्देश आहे नियमित योगा केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो मनाची एकाग्रता सुधारून आत्मविश्वास निर्माण होतो व मानवाला आनंदी जीवन जगता येते या योगा दिनानिमित्त महाविद्यातील कर्मचारी व सर्व विभागातील विभाग प्रमुख प्रा. राहुल काळीकर प्रा. विजय पाटील प्रा. अमोल बेंडसुरे प्रा. वीरभद्र हुले उपस्थित होते.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …