24/06/26
Breaking News

पाथरी विधानसभा मतदारसंघातील 420 कोटींच्या कामास मंजुरी

परभणी ( प्रतिनिधी)
पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्ता असणाऱ्या ताडबोरगाव ते सालापूरी या रस्त्यास आजच्या पुरवणी मागण्यात 42 किलोमीटरच्या कामासाठी सुमारे 420 मंजूर करण्यात आले आहेत,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आ राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीस मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे

मानवत तालुक्यातून सुरू होणाऱ्या प्र रा मा. २२२ ताडबोरगाव-देवळगाव आवचार-सावरगाव खु-पाळोदी- पिंपळा
SH ६१-मंगरुळ-रामपुरी बु- साळापुरी रुमणा रा म NH ७५२ K रा मा 61 ता पाथरी असा परभणी तालुक्या पर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचे काम, एशियन इन्फ्रा इन्वेस्टमेंट बँक (AIIB) अंतर्गत होणार आहे
या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी आ राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर अहवाल सादर करून त्याची गरज विषद केली होती, त्याचे महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी 42 किलोमीटरच्या कामासाठी 420 कोटी रुपयांची मंजुरी देत आज 22 जून रोजीच्या पुरवणी मागण्यात, बजेट बुक द्वारे त्यास अंतिम रूप दिले,
या रस्त्यामुळे पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना फायदा होणार असून ही गावे या दर्जेदार प्रमुख रस्त्याने जोडली जाणार आहेत अशी माहिती आ राजेश विटेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

या प्रमुख रस्त्याच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, एकनाथराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी पुढाकार घेऊन मंजुरी दिली असल्याचे आ राजेश विटेकर सांगितले

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …