17/10/26
Breaking News

ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदारांनी बंड पुकारात आपला वेगळा गट स्थापन केला. या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मान्यता दिल्याची माहिती समोर आलेली आहे. अशातच आता आज या बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बंडखोरी केलेल्या ६ खासदारांनी आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

सहा टायगर येथे उपस्थित आहेत – एकनाथ शिंदे

ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे सहा टायगर येथे उपस्थित आहेत, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांचे स्वागत केले.6 खासदार शिवसेनेच्या तिकिटावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील आणि निवडून येतील

6 खासदार शिवसेनेच्या तिकिटावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील आणि निवडून येतील, असे विधानही एकनाथ शिंदे यांनी केले.

 

 

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …