परभणी दि,18
परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली.
परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 14 आणि 15 ऑगस्ट अशा दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. लिमला परभणी ग्रामीण मधील बहुतांश गावे तसेच कातनेश्वर, रावराजुर यासह अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.त्याच्या नोंदी देखील प्रशासनाकडे आहेत यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद,तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबत शेत आखाडे, शेत जमिनी देखील बाधित झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यपद्धतीनुसार महसूल यंत्रणेमार्फत तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा तपशीलवार प्रस्ताव शासनास सादर करणे आवश्यक आहे, अशा नैसर्गिक आपत्तीत एस डी आर एफ आणि एनडीआरएफ निधी अंतर्गत निधी वितरणाकरिता जिल्हा प्रशासनाची भूमिका निर्णायक असते त्यानुसार आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा जेणेकरून निधी वितरण प्रक्रियेची पूर्तता नियमानुसार होईल अशी मागणी किसान सभेने केली आहे
अतिवृष्टी ग्रस्त महसूल मंडळांना अतिवृष्टी ग्रस्त म्हणून घोषित करा, एन डी आर एफ च्या मार्गदर्शक सूचनानुसार तात्काळ पंचनामे करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी किसान सभेचे उपजिल्हाप्रमुख उमेश देशमुख, शिवसेनेचे अरविंद देशमुख, रामराव डोंगरे, बंडू नाना बिडकर, मोईन पटेल, गंगाधर घाडगे, अनिल देशमुख,अनिस पटेल, कलीम पटेल, रंजीत गरुड, राजपाल देशमुख, विष्णू बोरचाटे, बंडू देशमुख, माणिक कदम, अशोक शिंदे,राम कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com