04/02/26
Breaking News

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या..प्रचंड घोषणाबाजी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृती खराब झाली असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळेंना अडवलं, पवारांविरोधात घोषणाबाजी

सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. भेट झाल्यानंतर सुळे आझाद मैदानावरून त्यांच्या कारकडे निघाल्या होत्या. मात्र मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा असी घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी तर खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. या सर्व स्थितीमुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या परिसरात काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवलं.

मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर सुप्रिया सुळे मात्र शांत होत्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार केला. तसेच प्रत्येकाच्या हातात ता मिळवला. सर्वांनाच नमस्कार करून त्या नंतर कारमधून निघून गेल्या. नंतर आंदोलकांनी त्यांच्या कारचाही पाठलाग केला. त्यांच्या कारलाही आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व घडामोडीमुळे सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण काही आंदोलकांनी भान राखून सुळे यांच्या कारला वाट करून दिली.

Check Also

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता …