16/10/26
Breaking News

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला सुरुवात

मुंबई,दि 11 ः
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आजपासून ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जातो, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला जात असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी x  माध्यमावर पोस्ट टाकत सांगितले.

महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली माझी लाडकी बहीण योजना  सुरू राहणार की बंद करणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे .  दरम्यान, आतापर्यंत 13 हफ्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे .  14 वा हफ्ता मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे .

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज !  ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. असेही महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी x माध्यमावर  सांगितलं.

 

Check Also

दादरमध्ये महिला आंदोलकाशी पोलिसाचं धक्कादायक कृत्य? व्हिडिओ व्हायरल; ‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’

‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’ मुंबई …