04/02/26
Breaking News

लोकप्रिय मालिका ‘दामिनी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ! मुख्य भूमिकेत दिसणार ही खास अभिनेत्री

मराठी दूरचित्रवाहिनीवरील ‘दामिनी’ ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नव्वदच्या दशकात प्रसारित झालेल्या या मालिकेने त्या काळात इतिहास रचत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता हीच मालिका नव्या अवतारात परत येत असून लवकरच ‘दामिनी २.०’ या नावाने प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे.

 

प्रेक्षकहो आता लवकरच सह्याद्री वाहिनीवर दामिनी मालिकेचा सीकवल येणार असल्याची चिन्ह समोर दिसू लागली आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वहिनीची ‘दामिनी’ ही लोकप्रिय मालिका जवळपास १० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती.

 

आता तब्बल २२ वर्षानंतर दामिनी मालिकेचा सिकवल येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ‘लक्ष्मी निवास’ या झी मराठीवरील मालिकेतील सुपर्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुप्रीती शिवलकर हिने याबाबत एक हींट दिली आहे. “ती परत येत आहे, तशीच वीज पुन्हा कडाडणार!”….असे म्हणत सुप्रीतीने या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे म्हटले आहे.

 

आता ‘दामिनी २.०’ मध्ये अभिनेत्री सुप्रिती शिवलकर मुख्य भूमिकेत झळकणार असून ती एका पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नवी दामिनी नव्या जोमाने आणि ताकदीसह प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे, असं मालिकेच्या प्रोमोमध्ये सांगितलं आहे. या मालिकेचं चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती सुप्रिती शिवलकर हिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. मात्र, मालिका नेमकी कधीपासून प्रसारित होणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

Check Also

‘दशावतार’चा जागतिक गजर! केवळ तीन दिवसांत मिळवला तब्बल…

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘दशावतार’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या चित्रपटाने विक्रमी कामगिरी …