गंगाखेड प्रतिनिधी :-
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये तसेच शाळेत ये-जा करणे अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मानव विकास योजनेअंतर्गत गंगाखेड येथील श्री सरस्वती विद्यालयात गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास अरुणराव केंद्रे , माणिकराव नागरगोजे , श्री मादरपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकली वितरित करण्यात आल्या.
यावेळी बोलताना संतोश तापडिया यांनी सांगितले की, मानव विकास योजना ही केवळ सायकल वाटपाची योजना नसून विद्यार्थिनींच्या शिक्षणातील सातत्य, आत्मविश्वास व स्वावलंबन वाढविणारी महत्त्वाची योजना आहे. सायकलमुळे वेळेची बचत होऊन विद्यार्थिनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Shabdraj www.shabdraj.com