09/05/26
Breaking News

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सेलूत “सामान्य ज्ञान “स्पर्धेचे आयोजन

सेलू / प्रतिनिधी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाचून साजरी करावी या उद्देशाने सेलूत त्यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी “सामान्य ज्ञान ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

येथील नूतन विद्यालयात दि १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ यावेळेत या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे .
या स्पर्धा गट (अ) इयत्ता ५ वी ते ७ वी
गट ( ब) इयत्ता ८ वी ते १० वी
व गट ( क) ११ वी ते पुढील
अशा तीन गटात घेण्यात येणार आहे .
ही परीक्षा M.Q.C. स्वरूपाची असून एकूण ५० प्रश्न राहणार आहेत .त्यापैकी २५ प्रश्न हेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित तर २५ प्रश्न महाराष्ट्रातील परिवर्तनवादी समाज सुधारक यांच्या जीवन कार्यावर आधारित असणार आहेत .सहभागी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी ३० मिनिटे केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे .
विजयी स्पर्धकांना प्रत्येक गटासाठी प्रथम बक्षीस ३००१/- रोख व संविधान प्रत ,द्वितीय २००१/- व संविधान प्रत तर त्रितीय बक्षीस १००१ /- व संविधान प्रत देण्यात येणार आहे .
दि २० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता येथील महेशनगर मधील साईनाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचा परितोषक वितरण सोहळा संपन्न होणार आहे .
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा .असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलींद सावंत व अध्यक्ष सुबोध काकडे यांनी केले आहे .
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गंगाधर अवचार ८००७५८१९९१ ,अभिमान पाईकराव ९८६०४७६३९४ ,सिद्धार्थ एडके ९५६१८७४०६३,सुमेध आवटे ९४२०४३२३८८,प्रकाश भालेराव
९७६३९७९३१९ व गजानन साळवे९९७०७१०५७४ यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे .

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …