सेलू दि २३ ( प्रतिनिधी )
बनावट कागदपत्र तयार करून त्यावर बनावट सही व शिक्के मारून आरोपी कडून मूळ मालकाची मालमत्ता हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपीच्या विरोधात सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ मालक नारायण चिक्याळ रा.विद्यानगर यांच्या नांवे असलेल्या शहरातील ७/२०२३ या मालमत्तेचे शिवप्रसाद आसाराम सानप रा .जिंतूर याने बनावट व खोटे कागदपत्र तयार करून त्यावर नोटरी यांची सही ,शिक्का व सेलूच्या रजिस्ट्री कार्यलय यांच्या नांवाने बनावट सही व शिक्का तयार करून त्या कागदपत्रावर मारून दस्त क्रमांक १०९१ /२०१३ पान क्रमांक १ ते १९ पानांची छायांकित रजिस्ट्री दि २६/३/२०१३ रोजी तयार करून घेतली . व सदरील मालमत्ता १ ,८०,०००/- रुपयात खरेदी केल्याची बनावट रजिस्ट्री खरी असल्याचे भासवून नगर परिषद ,सेलू कार्यलयात सादर केली .व मूळ मालक नारायण चिक्याळ यांची ७/२०२३ ही मालमत्ता स्वतःचे फायद्यासाठी फाईल क्रमांक ६२१/७/२०२५ दि २६/१२/२५ नुसार नांवे करून घेऊन मूळ मालक व शासनाची फसवणूक केली आहे .
नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी मोहम्मद सैफुल हक्क यांच्या फिर्यादीनुसार आरोपी शिवप्रसाद आसाराम सानप रा .जिंतूर याच्या विरोधात कलम ३१८(४),३३६(२),३४०(२) बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदरील प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
Shabdraj www.shabdraj.com