हिंगोली,दि 23 (प्रतिनिधी)ः
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी मजबूतपणे करेल त्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल.”अशी माहीती माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक मराठवाडा प्रभारी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.23) राष्ट्रवादी भवन येथे पार पडली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले “महागाई व बेरोजगारीमुळे जनता व युवक त्रस्त झाले आहेत त्यामुळे सत्ता बदल नक्कीच होणार पण संघर्ष करणे ही काळाची गरज आहे, हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी मजबूतपणे करेल त्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल.”
या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रवि शिंदे, हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, मनीषा आखरे, शहराध्यक्ष मुजीब पठाण, कळमनुरी तालुकाध्यक्ष डॉ.संतोष बोंढारे यांनी पक्षाकडे मागणी करून इच्छा व्यक्त केली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे बाबुराव दळवी, मोईन बागवान, गणेशराव गडदे, गजानन गव्हाणे, लक्ष्मण पोटे, सोनू चव्हाण, धीरज काकडे, डॉ.वेदांत मरळे,अभिजित देशमुख,सुशील बोंढारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
Shabdraj www.shabdraj.com