परभणी,दि 29 ः
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जुलै–डिसेंबर २०२५ व जानेवारी–एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहॅन्स्ड लर्निंग (NPTEL) मध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण ६१ विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये यश मिळवत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. यामध्ये ०४ विद्यार्थी व प्राध्यापकांनी एलिट + सिल्व्हर, २० विद्यार्थ्यांनी एलिट तर ३७ विद्यार्थ्यांनी यशस्वी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून रिमोट सेन्सिंग एसेन्शियल्स (२२), हायड्रॉलिक इंजिनिअरिंग (१७), मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ काँक्रीट स्ट्रक्चर्स (०६), इंडस्ट्री ४.० अँड इंडस्ट्रियल IoT (०६), इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स–२ (०४), फंडामेंटल्स ऑफ ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स (०२) तसेच पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग, प्रोग्रामिंग इन C, प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स आणि बिग डेटा कॉम्प्युटिंग (०१) अशा विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस श्री. सतीशभाऊ चव्हाण, सहसचिव मा. अनिलभाऊ नखाते तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री संग्रामभैया जामकर, श्री स्वराजसिंह परिहार, श्री रणजीत काकडे, तसेच संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर, सर्वविभागप्रमुख, गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. एस. एस. सिद्दीकी , एनपीटीईएल एसपीओसी समन्वयक प्रा. यामिनी देशवेना, विभागीय समन्वयक प्रा. मुळे, एस. एस., प्रा. जाधव एस. एम., प्रा. जे. जी. माघाडे आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या सांघिक प्रगतीमुळे विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या नामांकित संस्थांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून ऑनलाईन माध्यमातून सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होत असून, आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व कौशल्यविकास अधिक वृद्धिंगत होत आहे.
Shabdraj www.shabdraj.com