17/10/26
Breaking News

परभणीत शिवसैनिक पेटले! खासदार संजय जाधवांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

सोनपेठ,दि 18 (प्रतिनिधी)ः
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. सोनपेठमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याविरोधात तीव्र जोडेमार आंदोलन केले आहे.

सोनपेठ येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिक प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट खासदार संजय जाधव यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला आणि तिथूनच त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ‘गद्दार संजय जाधव’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा मोर्चा शहराच्या मुख्य भागात आणला.

शहरातील प्रमुख मार्गानं ही अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला होता. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीमुळे परभणी जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, “आम्ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंसोबतच आहोत”, हाच संदेश सोनपेठच्या या कडक आंदोलनातून शिवसैनिकांनी दिला आहे. या बंडखोरीचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे आंदोलन शिवसेनेचे विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार कल्याणराव रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली
या आंदोलनाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पिंगळे, तालुका प्रमुख संतोष गवळी, शहरप्रमुख अमोल दहीवाळ, श्रीकृष्ण साठे, रामेश्वर पांडूळे, बागुल शेख, संजय जाधव, गणेश जोशी, भास्कर भोसले, वैभव यादव, तुकाराम साठे, सिध्देश्वर आव्हाड, गणेश यादव, तेजस भोसले, इम्रान सय्यद, ज्ञानेश्वर परसे, वैभव सुरवसे, गोपाळ भोसले, फेरोज पठाण, अशोक सुरवसे, सुदर्शन बदाले, रमेश उंडाळकर, महादेव तुपस्मिंद्रे, गौतम शिंदे, महेश भोसले, विनोद यादव, माऊली शिंदे आदी शिवसैनिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …