हिंगोली, दि. ०५ जुलै
हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आज जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस (NSUI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शिक्षण व स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या मांडल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या वाढत्या घटना, परीक्षा शुल्कामधील भरमसाठ वाढ, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा वेळेत होत नसल्याने वाढत्या वयोमर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. तसेच, ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटीचा धोका अधिक असल्याने एमपीएससी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या व मागण्यांना योग्य स्वरूप देऊन शासन व संबंधित यंत्रणेकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील, असे आश्वासन हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. सतीशभाऊ पाचपुते यांनी दिले.
या कार्यक्रमास शेतकरी नेते रमेश शिंदे, बंटी नागरे, भास्कर पोले,जुबेर मामू, विठ्ठल जाधव, शेख सर, संजय गुहाडे, किसन जुमडे, दत्तराव जाधव, शशिकांत कांबळे, अनुप नायक, पीयूष सोनी, दिपक सोनुळे,अमन शेख, वाजिद बेग, अतुल नायक, सतिश चिभडे, वैभव इंगळे, रिया पिंपरे, प्राची नागरे, दशरथ फोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com