27/07/26
Breaking News

धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा; महिनाभराच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय, जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Dharmendra Pradhan Latest News

नवी दिल्ली | २५ जुलै : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.

NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने देशभर आंदोलन छेडले होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी आणि पक्षाचे कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते. या आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटना तसेच विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला होता.

या सर्व घडामोडींनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पत्रात काय म्हटले?

राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, “गेली चार दशके मी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी समर्पित भावनेने कार्य केले आहे. मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही सशक्त राष्ट्राचा पाया आहे, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.

देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो. भारताच्या युवा पिढीची स्वप्ने साकार करणे ही आपल्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील नैतिक जबाबदारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

Check Also

लाडकी बहीण योजना; 92 लाख लाभार्थी अपात्र, तुमचे नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर …