आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता आयुष्मान कार्ड मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. ‘आयुष्मान सारथी’ WhatsApp Chatbotच्या माध्यमातून घरबसल्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आयुष्मान कार्ड थेट WhatsApp वर डाउनलोड करता येणार आहे.
या सुविधेमुळे लाभार्थ्यांना कार्ड काढण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून, मोबाईलवरूनच प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
अशी करा प्रक्रिया
१. WhatsApp वर संदेश पाठवा :
सर्वप्रथम आयुष्मान सारथी WhatsApp क्रमांक +91 92846 33834 वर ‘Hello’ असा संदेश पाठवावा. त्यानंतर Chatbot Open होईल.
२. ‘Create Ayushman Card’ निवडा :
Chatbot मध्ये उपलब्ध पर्यायांमधून ‘Create Ayushman Card’ या पर्यायावर क्लिक करावे.
३. आवश्यक माहिती भरा :
यानंतर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक तसेच मागण्यात आलेली इतर आवश्यक माहिती भरावी. आवश्यकतेनुसार OTP द्वारे पडताळणी पूर्ण करावी.
४. eKYC पूर्ण करा :
लाभार्थीची eKYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्यास ती पूर्ण करावी. eKYC पूर्ण झाल्यानंतर कार्ड तयार करण्याची प्रक्रिया पुढे जाईल.
५. आयुष्मान कार्ड डाउनलोड करा :
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड थेट WhatsApp वर डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सुविधा
आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना योजनेच्या नियमानुसार उपचाराचा लाभ मिळतो. त्यासाठी आयुष्मान कार्ड महत्त्वाचे आहे. कार्ड मिळविण्याची प्रक्रिया डिजिटल माध्यमातून सुलभ केल्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या प्रसारित माहितीनुसार, लाभार्थ्यांनी अधिकृत प्रक्रियेतूनच आपली वैयक्तिक माहिती आणि OTP द्यावा. OTP किंवा आधारसंबंधी माहिती अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद क्रमांकावर शेअर करू नये.
Shabdraj www.shabdraj.com