16/10/26
Breaking News

मसापचा ८३ वा वर्धापनदिन व निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न

हिंगोली,दि 28
मराठवाडा साहित्य परिषदेचा ८३ वा वर्धापनदिन आणि त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी उज्वल इंग्लिश स्कूल येथे उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म सा प चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे (वाशीम) हे होते. मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे,उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके,डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते,डॉ. दीपा क्षीरसागर, मराठवाड्यातून आलेले नामवंत लेखक, मान्यवर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच नामदेव वाबळे,महारुद्र घेणेकर, दिलीप धामणे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, विजय वाकडे व प्रा. विलास वैद्य या ज्येष्ठ साहित्यिकांचा साहित्यातील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रा.कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाड्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत मराठवाडा साहित्य परिषदेचे महत्त्वपूर्ण योगदान विशद केले

या कार्यक्रमाचे संचलन राधिका देशमुख यांनी व आभार प्रदर्शन दिलीप धामणे यांनी केले.सकाळ सत्रा मध्ये मराठवाडा साहित्य परिषदे ची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. तदनंतर आजीवन सभासदांची आमसभा पार पडली‌ त्यामध्ये विविध ठरावांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन सर्वांनुमते ठराव पास करण्यात आले. विविध संमेलनांच्या नियोजनाविषयी चर्चा झाली.

वर्धापनदिन समारंभानंतर सायंकाळी निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न झाले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास वैद्य होते. मसापचे हिंगोली शाखा अध्यक्ष अशोक अर्धापुरकर यांनी प्रास्ताविक केले तर दिलीप धामणे यांनी ओघवते सूत्रसंचालन केले. महारुद्र घेणेकर,प्रकाश अंभोरे, शफी बोल्डेकर, गणेश आघाव, कलानंद जाधव, मुरलीधर पंढरकर, राजाराम बनसकर, सिंधुताई दहिफळे, राजकुमार मोरगे, दिलीप धामणे, पारिजात देशमुख, रघुनाथ घुगे, राधिका देशमुख, विजय ठाकरे, रसिका विडोळकर, गायत्री दरगु, सविता देशमुख, गौरी गुंडेवार, शिवदास पोटे, विजय गुंडेकर, मनोहर दिपके, शिवाजी कऱ्हाळे, श्रीरंग थोरात, महेश मंगनाळे यांनी बहारदार कविता सादर केल्या.या वर्धापनदिन सोहळ्यास, कवी संमेलनास साहित्यप्रेमी माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, नगरसेवक प्रा बलखंडे, उज्ज्वल इंग्लिश स्कूलचे संस्थापक चंद्रकांत पाईकराव, थवा प्रकाशनाचे गोडाती काळे, रघुवीर पतंगे, विजया पतंगे,ग्रंथपाल ससे, गाडे, दिपके उपस्थित होते.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …