17/10/26
Breaking News

केंद्रीय राज्यमंत्र्याकडून सेलू तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

सेलू ( प्रतिनिधी )
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना.श्री रामदासजी आठवले यांनी सेलू तालुक्यातील दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी हातनूर व वालूर परिसरातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतीसमोरील समस्यांची माहिती घेण्यात आली.
दुष्काळामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.या दौऱ्यामुळे परिसरातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या समस्या केंद्रीय प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

याप्रसंगी सेलूचे नगराध्यक्ष मिलींद सावंत ,नगरसेवक  मनीष कदम,  बाळासाहेब काजळे,निखील पहाडे देवानंद अंभोरे, डॉ संजय लोंढे, पंचायत समिती सदस्य  गणेश मुंडे, वालूरचे ग्रामपंचायत सदस्य  सिद्धार्थ भालेराव, माजी पंचायत समिती सदस्य इस्माईल अन्सारी, राहुल जाधव, सुनील धापसे अर्जुन बावीसे, दीपक बचिरे, विशाल धापसे, कपिल वाघमारे, विक्रम मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

 फरार आरोपीला औंढा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औंढा नागनाथ,दि 17 (प्रतिनिधी)ः औंढा नागनाथ पोलीस स्टेशन औंढा येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यातील दोन …