परभणी,दि 17 ः
परभणी येथील म. शी.प्र मंडळ संचलित श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील संगणक विभागाचे दोन विद्यार्थी देवश्री आनंद पाथरीकर व रघुराज सातोणकर यांची इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
सदरील स्पर्धा ही पुणे येथील ए एस एम (ASM) ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये रविवार दिनांक 11/10/ 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे” कलाम स्ट्रीम चॅलेंज 2026 ” या राष्ट्रीय स्पर्धेत संगणक विभागातील देवश्री आनंद पाथरीकर व रघुराज सातोनकर यांनी उत्कृष्ट मॉडेल व सादरीकरण करून तज्ञ परीक्षकाची मने जिंकली त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या यशाबद्दल त्यांची श्रीहरीकोटा येथील सतीश धवन इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश असा आहे की तंत्रज्ञान, विज्ञान संशोधन, अभियांत्रिकी, कला गणित, (STREAM) या क्षेत्रातील तरुण संशोधकांना व विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देणे हा होय, तसेच तांत्रिक कौशल्य विकसित करण्याची संधी प्राप्त होते. या इस्त्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, वैज्ञानिक प्रयोग व आधुनिक तंत्रज्ञान याची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन क्षेत्रात करिअरची संधी प्राप्त होते सदरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ शाहिद ठेकिया व संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा रसिका चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्षअनिल नखाते व सर्व सदस्य प्राचार्य डॉ. शाहिद ठेकीया सर्व विभागातील विभाग प्रमुख प्रा. रसिका चौधरी प्रा. राहुल काळीकर प्रा. विजय पाटील प्रा. अमोल बेंडसुरे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Shabdraj www.shabdraj.com