17/10/26
Breaking News

आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणीत महायुतीची बैठक

परभणी,दि 17 
छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघातील  महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ रविवार (दिनांक 18 ) रोजी सांयकाळी  पाच वाजता  श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघातील   निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचार करत आहेत. रविवार दिनांक 18 फेब्रुवारी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात महायुतीच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पालकमंत्री श्रीमती  मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार विक्रम काळे, आमदार सईद खान, माजी खासदार  अॅड.सुरेश जाधव, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, भाजपा महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अक्षय देशमुख, रिपाई जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती राहणार आहे.यावेळी शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजपा,रिपाई व महायुतीच्या सर्व घटकपक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

हिंगोलीत दसरा महोत्सव स्पर्धेत महसूल क्रिकेट संघ विजयी

हिंगोली,दि 17 संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघ …