04/02/26
Breaking News

सेलू तालूक्यात दमदार पाऊस,नदीनाल्यांना पूर,सेलू पाथरी रस्ता बंद

परभणी,दि 22 ः
मागील अनेक दिवसांच्या उघाडी नंतर १७ जूलै रोजी सेलू तालूक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाली होती.त्यानंतर २१ जूलै च्या मध्यरात्री संपूर्ण तालूक्यात सूरू झालेला दमदार पाऊस २२ जूलै मंगळवार सकाळी ९वाजेपर्यंत सूरूच होता त्यामूळे तालूक्यातील दूधना,कसूरा व करपरा नद्यांना पूर आल्यामूळे मंगळवारी दिवसभर तालूक्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

सोमवारी मध्यरात्री पासून मंगळवारी सकाळपर्यंत तालूक्यात सरासरी ५३.०६ मीमी पावसाची नोंद झाली आहे तर चिकलठाणा मंडळात सर्वाधिक ८७.८ मी.मी.,मोरेगाव मंडळात ७९.३ मी.मी.,वालूर ४३.६ मी.मी.,देऊळगाव गात ३६.३ मी.मी.तर सर्वाधीक कमी कूपटा मंडळात २३.८ मी.मी.इतकी पावसाची नोंद झाली आहे.तालूक्यात दूस-यांदा दमदार पाऊस पडल्यामूळे तालूक्यातील सर्वच नद्या दूथडी भरून वाहू लागल्या सेलू -पाथरी दरम्यान असणारी कसूरा नदीवरील कूंडी येथील पूलावरून मंगळवारी सकाळी ११:३० वाजता पाणी वाहू लागल्यामूळे सेलू -पाथरी दरम्यानच्या एस.टीच्या ७ फे-या रद्द झाल्या त्याशिवाय पाथरी आगारातून सेलूकडे येणा-या एस.टी. न आल्यामूळे तालूक्यातील इतर ठिकाणच्याही फे-या रद्द करव्या लागल्या तसेच सेलू -वालूर दरम्यान राजवाडी येथून दूधना नदीचे पाणी पूलावरून वाहू लागल्याने राजवाडी -वालूर वाहतूक ७:४५ पासून बंद झाली होती.त्यामूळे एस.टीच्या १० फे-या रद्द करण्यात आल्या तसेच मोरेगाव -वालूर रस्त्यावरील साळेगाव खडकी पूलावरून पाणी असल्याने वाहतूक बंद होती.कसूरा नदीचे पाणी पूलावरून वाहू लागल्यामूळे सकाळी ८ वाजल्यापासून सातोना -आष्टी रस्ता बंद असल्याने एस.टीच्या ४ फे-या रद्द करण्यात आल्या.करपरा नदीमूळे नांदरा- डासाळा- आष्टी रस्ता बंद असल्याने एस.टीच्या ६ फे-या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

 

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर १७ व २२ जूलै रोजी तालूक्यात अतिवृष्टी सह दमदार पाऊस झाल्याने शेतक-यावरील दूष्काळाचे संकट टळले मात्र त्याच बरोबर दोन्ही पावसामूळे नदी काठावरील शेतक-यांच्या शेतातील पिकात पाणी जावून शेतक-यांच्या पिकांचे मोठे नूकसान झाले २२ जूलै रोजी झालेल्या पावसामूळे तासूक्यातील साळेगाव येथील तूकाराम विठ्ठल गायके यांच्या गट.क्र.१२३ मधील शेतातील दूधना प्रकल्पावरील शेतचारी फूटून पावसाचे पाणी शेतात शिरल्यामूळे शेताला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.यामूळे शेतातील सोयाबीन चे पिक व माती वाहून गेल्याने शेतक-याचे आर्थीक नूकसान झाले आहे.त्यामूळे नदी काठावरील नूकसानग्रस्त शेतक-यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधीत शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …