मुंबई,दि 25 ः
सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असून, ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले आहेत, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, मात्र या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाहीये. फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
Shabdraj www.shabdraj.com