04/02/26
Breaking News

Shabdraj

पुर्णेतील वीजचोर ठेकेदाराचे प्रकरण महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच दडपले

ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार; पालकमंत्री, व्यवस्थापकीय संचालक लक्ष देणार? पूर्णा / प्रतिनिधी – येथिल महावितरण विभागाच्या अभियंत्यांनी शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी टाकीचे बांधकाम करणाऱ्या एका ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात वीजचोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केवळ थातुरमातुर दंडात्मक कारवाई करत हे गंभीर प्रकरण दडपल्याचे स्पष्ट झाले आहे.   वीजचोरी करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्याने स्थानिक महावितरणच्या …

Read More »

सेलूत बसस्थानकासमोर वाहन लावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

वाहतूक खोळंबली; एकाच रस्त्यामुळे बसचालकांचे होत आहेत हाल सेलू / प्रतिनिधी – शहरातील बसस्थानकावर स्थानकात बस येणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट सोडून गुत्तेदार पसार झाल्यामुळे या बसस्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व बसेसला एकच मार्ग असल्याने आणि आज शुक्रवार रोजी एका ३२ वर्षीय तरुणाने बस ये- जा करणाऱ्या या एकच असलेल्या रस्त्यावरच कार उभी केल्याने सुमारे तासभर रस्ता मोकळा करेपर्यंत ट्राफिक बंद …

Read More »

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता हा व्यवहार रद्द होणार असल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी या व्यवहाराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.   अजित पवार म्हणाले, “माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून ती समिती …

Read More »

शिवसेना ( उबाठा ) शहरप्रमुख पदी किशोर भांडवले तर संघटक पदी शक्ती बोराडे यांची निवड

सेलू ( नारायण पाटील ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सेलू प्रभारी शहरप्रमुख पदी किशोर भांडवले शहर संघटक पदी शक्ती बोराडे तर उपतालुका प्रमुख पदी माऊली सोळंके यांची निवड करण्यात आली आहे . पक्ष्याच्या जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी नुकतेच सबंधितांना नियुक्तीचे पत्र देऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे कळवले आहे . यावेळी उपजिल्हाप्रमुख रंजित गजमल ,महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल कथले …

Read More »

२४ वर्षीय तरुणाचा कुंडी परिसरात आढळला मृतदेह

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कुंडी परिसरात एका जुन्या रस्त्यावर शहरातील रहेमान नगर मधील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार ६ नोवेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रात्री साडेआठच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद सेलु पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील रहमान नगर मध्ये राहत असलेल्या समीर वहाब शेख वय …

Read More »

पालीका निवडणुकीत  सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांना का संधी नाही ?

 रामप्रसाद ओझा, गंगाखेड,दि 07 ः गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव जाहीर झाले असून, तेरा प्रभागांतील एकूण २६ जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिला सहभाग, नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही आरक्षण प्रणाली अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात मात्र सार्वजनिक क्षेत्रात अथक परिश्रम घेणाऱ्या, सामाजिक कामाचा भक्कम पाया असलेल्या सक्षम …

Read More »

गंगाखेडात नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीकडून सौ. निर्मला तापडिया यांना उमेदवारी

 रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 07 ः शहर विकास आघाडी तर्फे गंगाखेड नगराध्यक्ष पदासाठी सौ. निर्मला गोपालदास तापडिया यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. आघाडीचे नेते आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी ही घोषणा करताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्यांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत तेरा प्रभागांसाठीच्या सर्व २६ जागांच्या उमेदवारांची घोषणा देखील लवकरच करण्यात येणार असल्याची …

Read More »

गंगाखेडच्या गौरव दामा यांचे युजीसी परीक्षेत यश

रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 05  गंगाखेडचे सुपुत्र गौरव (गौरीशंकर) संजय दामा यांनी आपल्या परिश्रम, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण भारतभर आपले नाव उज्ज्वल केले आहे. युजीसी अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत दहालाख हून अधिक विद्यार्थ्यांमधून यश संपादन करत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापकपदी त्यांची निवड झाली आहे. गौरव दामा हे गंगाखेड नगरपरिषदेचे …

Read More »

पूरग्रस्त शेतकऱ्यांना भारतीय किसान संघाकडून हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप

गंगाखेड,दि 05 ः अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीकच वाहून गेले असताना, त्यांना आधार देण्यासाठी भारतीय किसान संघ पुढे सरसावला आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संवेदनशील पाऊल उचलत संघाकडून परभणी जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दि. ०३ नोव्हेंबर रोजी परभणी, पुर्णा, पालम आणि गंगाखेड तालुक्यातील एकूण पाच गावांमधील १० शेतकऱ्यांना हा थेट लाभ मिळाला. पिकांचे १०० …

Read More »

सेलूत पालीकेच्या कोंडवाड्यात चारा,पाण्या अभावी गाईचा मृत्यू झाल्याची तक्रार

सेलू( प्रतिनिधी ) सेलू नगर परिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे व चारा पाण्या अभावी आपली कोंडवाड्यातील गाय मरण पावल्याची तक्रार रामेश्वर नारायण बरडे यांनी दिली आहे. सेलू नगर परिषदेच्या वतीने शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली आहे .त्यामध्ये दि ३ /११/२५ रोजी रामेश्वर नारायण बरडे यांची गाय कोंडवाड्यात बांधण्यात आली होती .हे समजताच बरडे यांनी वारंवार नगर परिषद कार्यालयात …

Read More »