दै. शब्दराज/ रामप्रसाद ओझा, गंगाखेड. गंगाखेड नगर परिषद तसेच जिल्हा परिषद-पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी नव्याने नियुक्त प्रभारी जिल्हाध्यक्ष मा. बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करून शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला ॲड. संतोष मुंढे, आ.नु.जा. राज्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रविराज देशमुख, राजुशेट सावंत, शहराध्यक्ष शेख युनुस, लक्ष्मण लटपटे, शेख महेबुब …
Read More »Shabdraj
ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा समावेश नगर परिषदेच्या बोधचिन्हात करण्याची मागणी
सेलू (नारायण पाटील ) शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा समावेश सेलू नगर परिषदेच्या बोधचिन्हात करण्यात यावा . अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सेलू यांच्याकडे करण्यात आली आहे . या निवेदनावर सचिन धापसे ,संध्या चिटणीस ,अशोक उफाडे मनीष कदम यांच्यासह नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत . धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणून सेलूची ओळख …
Read More »सालगड्यानेच मारला डल्ला, मालकाचे ५२,५००/- केले लंपास
सेलू / प्रतिनिधी – शेतात काम करणारा सालगडी म्हणजे मालकाच्या विश्वासातील असतो परंतु सालगड्यानेच मालकाच्या खिशातील रक्कम पळवल्याची घटना शिंदे टाकळी येथे घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिंदे टाकळी येथील मनोहर गंगाधरराव गजमल यांच्या कडे आरोपी गोविंद बापूराव गजमल हे शिंदे टाकळी येथील गट नंबर ६३ मधील शेत आखाड्यावर सालगडी म्हणून कामाला होता . गोविंद याने २२/७/२५ …
Read More »सेलू पोलिसात अकस्मात मृत्यूच्या दोन घटनांची नोंद
सेलू / प्रतिनिधी – शहरात दोन आकस्मित मृत्यूच्या घटना घडल्या असून दिलेल्या खबरीवरून सेलू पोलिसात आकस्मित मृत्यू रजिस्टर ला नोंद घेण्यात आली असून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. यामध्ये जालना येथील पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेला राजगड कॉलनी सेलू येथील गोपाल तुकाराम कल्याणकर (२०) हा श्वसनाचा त्रास होत असल्याने दि ३०/१०/२५ रोजी …
Read More »गंगाखेड नगरपरिषदेचे कर्मचारी रामविलास खंडेलवाल सेवानिवृत्त
रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 01 ः नगरपरिषदेतील मनमिळावू आणि प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख असलेले वाहनचालक तथा अग्निशामक दल प्रमुख रामविलास बन्सीलाल खंडेलवाल हे (दिनांक ३१ ऑक्टोबर) रोजी नियमित वयानुसार ३७ वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. आपल्या दीर्घ सेवाकाळात खंडेलवाल यांनी नगरपरिषदेच्या विविध वाहनांवर चालक म्हणून जबाबदारीपूर्वक कार्य केले तसेच काही काळ स्वच्छता निरीक्षक म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. त्यांनी कार्यकाळात …
Read More »‘प्रेग्नेंट जॉब‘ च्या नावाखाली कंत्राटदाराला गंडा.. सावध राहा
पुण्यातील एका ४४ वर्षीय कंत्राटदाराला सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ दिसला ज्याने त्याच्या आयुष्यात उलथापालथ करून टाकली. व्हिडीओमध्ये एक महिला होती, जी खूप गंभीर आवाजात म्हणत होती- ‘मला असा माणूस हवा जो मला आई बनवू शकेल. मी त्याला २५ लाख रुपये देईन. मला त्याची जात, रंग किंवा शिक्षण याच्याशी काही देणे-घेणे नाही.‘ आता नेमकं काय झालं? जाणून घ्या… पुण्यातील कंत्राटदाराने पाहिलेला हा व्हिडिओ …
Read More »पाथरीत मोठा राजकिय भुकंप,अनिल नखाते यांच्यावर अविश्वास ठराव
रमेश बिजुले पाथरी,दि 31 काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्ष होताच पहिला झटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला आहे.पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमदार राजेश विटेकर यांचे कट्टर समर्थक अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे. पाथरी मतदार संघात आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वरचष्मा आहे. मागील वर्षभरात बदलत्या राजकीय समीकरणात दुर्राणी यांची साथ …
Read More »डासाळा मध्यवर्ती बँकेत ग्राहकांची झाली फसवणूक
सेलु,ता 31 ः तालुक्यातील डासाळा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत एका ५०वर्षीय महिलेने आपल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी एक हजार रुपयाची विड्रॉल बँकेत दिली परंतु या महिलेच्या मोबाईलवर दहा हजार रुपये काढल्याचा आलेल्या मेसेजने हे उघड झाले. तर याच बँकेमध्ये ३३ वर्षीय एका ग्राहकांना डासाळा मध्यवर्ती बँकेतून त्यांच्याच सेलू येथील सेलू बडोदा बँकेत केलेले विस हजार रुपयाचे आरटीजीएस दुसऱ्याच इसमाच्या …
Read More »सेलूतील बालाजी मंदिराचे लवकरच भाग्य उजळणार
सेलू (नारायण पाटील ) व्यकंटेश बालाजी म्हणजे बऱ्याच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून गिरी बालाजीची ओळख असतांना सेलू शहरातील पांडे गल्लीतील अत्यंत पुरातन असलेले बालाजी मंदिर मात्र अजूनही दुर्लक्षितच होते . परंतु गल्लीतील तरूण मंडळींनी पुढाकार घेतला आहे.मंदिराच्या नविन बांधकामाचा शुभारंभ झाला आहे. यासाठी जिल्हा वार्षीक योजना नगरोथान मधून २३ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.यावेळी पालकमंत्री, बाजार …
Read More »एक खराब रस्ता दुरुस्त करण्यासाठी दुसरा रस्त्यावर केला चिखल
सेलु,दि 31 (प्रतिनिधी)ः सेलू तालुक्यात खराब रस्त्यांचे दुरुस्तीकरण,नवीन रस्ते करण्याचे काम जोमात सुरू आहे.पण या कामात एक अजब प्रकार घडला आहे.एक रस्ता पूर्ण करण्यासाठी दुसरा रस्ता खराब करून ठेवल्याने शेतकऱ्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासन सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागावी कुणाकडे हे मात्र शेतकऱ्यांना समजत नसल्याचा प्रकार सुरू आहे. सेलू डिग्रस रस्त्या हा पूर्ण पणे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com