16/10/26
Breaking News

विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून वाढदिवस साजरा

नगरसेवक दिपक कोल्हाळ यांचा आदर्श पायंडा

सेलू / प्रतिनिधी – आजच्या आधुनिक युगात सगळीकडे आपल्या पुरता स्वार्थी विचार करण्याची वृत्ती बळावत असताना वाढदिवस देखील खूप गाजावाजा करीत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.यासाठी अवास्तव खर्च देखील केला जातो .

या सर्व बडेजावाला फाटा देऊन प्रभाग क्र 4 मधील नगर सेवक दिपक कोल्हाळ यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतू तून श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील गरीब व होतकरु विदयार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून एक आदर्श पायंडा प्रस्थापित केला आहे.

या प्रसंगी मुख्याध्यापक संजय धारासुरकर, किशोर खारकर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, दिपक कोल्हाळ, शिवाजी जाधव तसेच मित्र मंडळी यांची उपस्थिती होती.

शुभेच्छापर मनोगतात संजय धारासुरकर यांनी दिपक कोल्हाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या पुढेहीं शाळेला असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी ३६ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले तर कृष्णा पांचाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षिका अमिता जवळेकर,कीर्ती कुलकर्णी,रुपाली कुर्डे, स्वप्नील सुरुसे,धीरज दूधगोंडे,सेवक विठ्ठल काळे,बाबासाहेब बदाले, श्याम मुंडे यांनी परिश्रम घेतले.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …