18/07/26
Breaking News

भाजपाच्या जिल्हा बैठक संपन्न; संकल्प से सिद्धी अभियानाचे नियोजन

हिंगोली (प्रतिनिधी):
केंद्रातील मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या तपपूर्ती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘संकल्प से सिद्धी’ अभियान, तसेच भारतीय जनता पार्टीच्या आगामी विविध संघटनात्मक व जनसंपर्क कार्यक्रमांच्या नियोजनासाठी हिंगोली जिल्हा भाजपची बैठक आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी संपन्न झाली.

या बैठकीला अभियानाचे प्रदेश संयोजक व माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, मराठवाडा संयोजक नितीन काळे, मराठवाडा सह-संयोजक राहुल लोणीकर, खासदार रामरावजी वडकुते, आमदार तान्हाजीराव मुटकुळे आणि जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अतिश दांडेगावकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकूळे,जिल्हा उपाध्यक्ष मिलींद यंबल,जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या १२ वर्षांच्या यशस्वी प्रवासाने देशाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताचे निर्णय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी काळात व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यावर भर दिला जाईल.या बैठकीत संकल्प से सिद्धी अभियान प्रभावीपणे राबविणे, पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, प्रत्येक बूथस्तरापर्यंत अभियान पोहोचविणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि आगामी सर्व पक्षीय कार्यक्रम यशस्वी करणे या विविध विषयांवर सखोल चर्चा करून उपस्थित पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …