हिंगोली (प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांची केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार विषयक संसदीय स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.देशातील वाढते शहरीकरण,गृहनिर्माण योजना आणि पायाभूत सुविधांचा विकास या दृष्टीने ही उच्चस्तरीय समिती राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. खासदार वडकुते यांच्या या निवडीबद्दल हिंगोली येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार तान्हाजीराव मुटकूळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांनी खासदार रामराव वडकुते यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित,कार्याध्यक्ष पवन उपाध्ये,भानुदास वामन,नंदू नायक,सचिन शिंदे उपस्थित होते.

Shabdraj www.shabdraj.com