17/07/26
Breaking News

रिलायबल अँग्रो फूड्सचा पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपक्रम

पूर्णा,(सुशील दळवी) :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रिलायबल अॅग्रो फूड्स, कानडखेड (ता. पूर्णा) यांच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यामध्ये पर्यावरण मार्च, सायक्लोथॉन, जनजागृती सत्रे तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि हरित भविष्यासाठी नागरिकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कानडखेडचे माजी सरपंच मारोतराव बखाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांना प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी एचएमए ग्रुपचे संचालक शाहिद हुसेन, व्यवस्थापक अमरनाथ पटेल, डॉ. मोहम्मद अयुब, अब्दुल समद, श्रवण झा, शेख इस्माईल तसेच रिलायबल अॅग्रो फूड्सचे कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून पुढील पिढ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …