04/02/26
Breaking News

मराठवाडा

अजित पवार यांनी घेतली मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची विचारपूस केली. हत्येला एक वर्ष झाले, तरी दादा अजून आम्हाला न्याय मिळाला नाही, अशी खंत वैभवी देशमुख हिने व्यक्त केली. तर गावकऱ्यांनी देखील अजित पवारांकडे न्यायाची …

Read More »

उजळांबा येथे रविवारी पार्वती परमेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा

परभणी,दि 28 परभणी तालुक्यातील उजळांबा येथील वसंत विलास फॅमिली रेस्टॉरंटच्या परिसरात पार्वती परमेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा तसेच महंत,महाराज यांच्या  सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी (ति.30) करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महादेवाची प्राणप्रतिष्ठा ष.ब्र.प.पू. काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर आणि कीर्तन महर्षी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प. जनार्दन महाराज …

Read More »

राम जन्मभूमी अयोध्येत धर्मध्वज स्थापना; परभणीत उत्साहात आनंदोत्सव

परभणी / प्रतिनिधी – अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. पाचशे वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला या ध्वजरोहणामुळे प्रतीकात्मक पूर्णविराम मिळाल्याचा आनंद देशभरात व्यक्त करण्यात आला.   या निमित्ताने परभणी शहरातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यंकटेश मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात …

Read More »

सेलू येथे ४ डिसेंबर रोजी दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन

सेलू / प्रतिनिधी – येथील ब्राम्हण गल्ली मधील दत्त मंदिर मध्ये दत्त जयंती निमित्त दत्तजन्मोसव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . दि २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी दत्त मूर्तीस अभिषेक तसेच सकाळी ७ ११ या वेळेत गुरुचरित्र पारायण व त्यानंतर भिक्षाफेरी,दत्त पंचपदी व आरती होणार आहे . मधुकरराव वाकडीकर ,अरुनराव वाकडीकर ,रेणूकादासराव …

Read More »

श्रीरामजी भांगडिया यांचा बोलण्यापेक्षा कृतीवर भर होता – प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

सेलू ( प्रतिनिधी ) दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांचे स्वातंत्र्य आंदोलन, हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय योगदान होते. त्यांची संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मुल्यांवर निष्ठा होती. ते विचारापेक्षा कृतीवर भर देत. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. ते ‘ श्रीरामजी भांगडिया यांचे जीवन – कार्य’ या विषयावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने दलितमित्र श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती …

Read More »

सेलूत रंगभरण चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आणि सेलू शहर विकासाचे शिल्पकार पहिले नगराध्यक्ष दलितमित्र कै.श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, ता.२६ नोव्हेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालयात सकाळी ९ वाजता करण्यात आले. स्पर्धेला विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ६६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सेलू शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेचे हे १८ वर्षे आहे. …

Read More »

दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्यावतीने  दिव्यांग पेंशन संदर्भात उपोषणाचा इशारा

सेलू ( प्रतिनिधी ) दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्यावतीने आज सेलु तहसीलदार यांना दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर तालुकाध्यक्ष डिगांबर घोळवे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये शासनाच्यावतीने दिव्यांगांना प्रतिमहा 2500 रुपये पेंशनची घोषणा होऊनही सेलु तालुक्यातील 70% दिव्यांगांना 1500 रुपये पेंशन त्यांच्या खात्यावर पडत आहे तर काही दिव्यांगांना पेंशनच पडत नाही,तसेच सदर घोषणा होऊनही बराच …

Read More »

डोंगराळे येथील घटनेचा सेलूत तीव्र निषेध

सेलू( प्रतिनिधी ) नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे भागात राहणाऱ्या निष्पाप चिमुकलीचा बलात्कार करून निर्घुण खून करण्यात आला या नीच वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज सेलू सराफ व सुवर्णकार असोशिएशन यांच्या वतीने आप आपली प्रतिष्ठाने बंद करून मा.उपजिल्हाधिकारी,सेलू, मा.तहसीलदार,सेलू, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी सेलू यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना सोनार समाजाच्या तीव्र भावना कळवून आरोपीला कठोर शासन करावे व पीडितेला …

Read More »

शेख अफान महेमुद यास शिस्तप्रिय पुरस्कार

गंगाखेड,दि 19 येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयातील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी पत्रकार महेमुद शेख यांचा मुलगा शेख अफान महेमुद याला उत्कृष्ट शिस्त,वेळपालन आणि आदर्श वर्तनाबद्दल “शिस्तप्रिय विद्यार्थी पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. (दिनांक 19 नोव्हेंबर बुधवार) रोजी शाळेत आयोजित विशेष समारंभात मुख्याध्यापक तुकाराम कांगने,वर्गशिक्षक सूर्यकांत बडवणे यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. शिस्तप्रिय विद्यार्थी पुरस्कार दैनिक अभ्यास करून वर्गकार्यात …

Read More »

गंगाखेड येथे निवडणुक अधिकाऱ्यांची बैठक 

गंगाखेड,दि 19 येथील  नगर परिषद निवडणूक निमीत्त बुधवारी (दि.19)  रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय नवीन इमारत येथे निवडणूक तयारी संदर्भातील  बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठकघेण्यात आली.या बैठकीला क्षेत्रीय अधिकारी क्रमांक १०, रूट गाईड १३, B.L.O, FST, VST तसेच निवडणूक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी …

Read More »