09/05/26
Breaking News

मराठवाडा

यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे-उद्योजक मधुकर पौळ

सेलू ( प्रतिनिधी ) यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी अत्यंत आवश्यक असते. अभ्यासात नियमितता व वेळेचे योग्य नियोजन असेल तरच ध्येयप्राप्ती शक्य होते, असे प्रतिपादन उद्योजक मधुकर पौळ यांनी केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते. व्यासपीठावर उपेंद्र बेलूरकर, प्रमुख पाहुणे …

Read More »

मानवाला विचारांची दिशा देणे संत वाङ्म्याचे कार्य आहे-चैतन्य महाराज देगलूकर

सेलू (नारायण पाटील) मानव हा विचारांमध्ये अल्पविचार करतो.सकळ मानव जातीला व्यापक विचारांची गरज आहे.हे संतांनी हजारो वर्षांपूर्वी ओळखले आहे.त्यामुळे केवळ मोक्ष नाही तर सर्व मानव जातीला विचारांची योग्य दिशा देणं ही संत वाङ्म्याचे कार्य आहे असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. येथील वसंत प्रतिष्ठाण व खारकर परिवाराच्या वतीने आयोजित ‘ पसायदान ‘ या प्रवचन मालेचे दुसरे पुष्प त्यांनी …

Read More »

सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात आहे-चैतन्य महाराज देगलूरकर

सेलू दि ०२(नारायण पाटील) पसायदान हे मानवी जीवनासाठी अतिशय महत्वाचे आहे.कारण जगतामधील सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला आहे.७०० वर्षांपूर्वीचे पसायदान आणखी सात हजार वर्षे जरी झाले तरी मानवी कल्याणाचा पसायदानात मांडलेला विचार स्वीकारावा लागेल असे मोलाचे विचार पंढरपूर येथील श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूकर यांनी मांडले.येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार दि ०२ एप्रिल …

Read More »

परभणीत व्हाईस ऑफ मिडीयाचे मंगळवारी धरणे आंदोलन

परभणी,दि 03 (प्रतिनिधी)ः राज्यभरात पत्रकारांवर हल्ला करण्यासह धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. या विरोधात व्हाईस ऑफ मीडियाने राज्यभर धरणे आंदोलन पुकारले आहे. याच अनुषंगाने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यात नऊ तालुक्यांचे पदाधिकारी,सदस्य सहभागी होणार आहेत अशी माहीती राज्याचे कार्याध्यक्ष श्री. विजय चोरडिया यांनी दिली. व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यसहचिटणीस  श्री. …

Read More »

पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन तीव्र करणार-विजय चोरडिया

जिंतूर,दि 02  राज्यभरात पत्रकारावर होत असलेले विविध हल्ले, पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणे यासह पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येत असून शासनाने याची दखल न घेतल्यास राज्यभरामध्ये पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा व्हॉइस ऑफ मीडिया चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला. पत्रकारांच्या विविध मागण्याच्या संदर्भात दि 2 एप्रिल गुरुवार रोजी तहसील ऑफिस जिंतूर येथे आयोजित करण्यात …

Read More »

वृद्धाश्रमातील वृद्धांना फळ वाटप करून दिला गायनाचा आनंद

“शाम ए सरगम” संगीत परिवाराचा अभिनव उपक्रम सेलू / नारायण पाटील – हिंदू नववर्षाच्या आरंभी दि. २९ मार्च २०२६ रविवार सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ‘कामदा एकादशी’ निमित्ताने भगवंताच्या नुसत्या मुर्तीचे पूजन करुन न थांबता,”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या प्रमाणे सजीव मनुष्य रुपी भगवंताच्या सेवेत ईश्वर आहे या संकल्पनेतून पाथरी जवळील ॐकार वृध्दाश्रमातील 35 वृध्द …

Read More »

अबब… ५६ गॅस सिलिंडरची चोरी

५६ सिलिंडरसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास; खवणे पिंपरी येथील घटना पाथरी / प्रतिनिधी – तालुक्यातील खवणे पिंपरी येथे चोरट्यांनी गॅस एजन्सीच्या गोदामावर डल्ला मारत तब्बल ५६ भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. २८ मार्च) रात्री ते …

Read More »

उदयोगशील विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज-डॉ. अमोल देशपांडे

सुशिल दळवी) पूर्णा ,ता 29 ः वाढत्या बेरोजगारीच्या आव्हानात्मक परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्याकरिता आणि सर्वांनाच नोकऱ्या आजच्या काळात मिळणे अशक्य असल्याकारणाने उद्योग विश्वात विद्यार्थी पाय रोवून उद्योगशील कसा होईल ? याकरिता उद्योगशील संस्कार आणि वयवसाय निवडीचे स्वातंत्र्य याबाबत जाणीव जागृती करून उदयोगशील विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हास्तरीय सुलभक मारोती कदम यांनी केले . ते व्यवसाय शिक्षण व …

Read More »

संघर्षातूनच खरे जीवन फुलते-डॉ. स्मिता देऊळगावकर

सेलू( प्रतिनिधी ) आशा आपराद लिखित ‘ भोगिले जे दुःख त्याला ‘ या आत्मचरित्रात लेखिकेने सहन केलेले दुःख, अन्याय, अत्याचार यांचे वास्तववादी चित्रण केले आहे. संघर्ष हेच जीवन आहे. पण, संघर्षातून मृत्यू येत नाही तर जीवन फुलते. आपले जीवन बदलायचे असेल तर शिक्षण हिच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. हेच ‘ भोगिले जे दुःख त्याला’ या आत्मचरित्रातून शिकायला भेटते. असे प्रतिपादन …

Read More »

सेलूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ( दि. २३ ) रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या नियोजन बैठकीस परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट देऊन सुसंवाद साधला. या प्रसंगी सेलूचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांची उपस्थिती होती. बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि …

Read More »