08/11/26
Breaking News

मराठवाडा

जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा

: मनोज जरांगे पाटील  यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस असून सध्या ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने त्यांनी पाटोद्यात सलाईन घेतले असून पाणीही प्यायल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. दरम्यान, डॉक्टरांकडून जरांगे पाटलांच्या प्रकृतीची तपासणी केली जात असून त्यांनी प्रवास करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम असून उद्या आपण मुंबईसाठी रवाना …

Read More »

गंगाखेडला स्वतंत्र वाहतूक पोलीस कार्यालय देऊ! शांतता समितीच्या बैठकीत वाहतूक कोंडी-अतिक्रमणावरून चर्चा; आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीने राजकीय रंग

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनासह शहरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला. व्यापारी महासंघ, व्यापारी, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील व शांतता समिती सदस्यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.   शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता स्वतंत्र वाहतूक पोलीस कार्यालय देण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक कुमावत यांनी दिले, तसेच …

Read More »

धनगर एसटी आरक्षणासाठी १७ सप्टेंबरला परभणीत धडकणार ‘महामोर्चा’; शशिकांत वडकुते यांचे हिंगोलीतून आवाहन

​हिंगोली / विशेष प्रतिनिधी – धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेल्या मुक्तिसंग्राम लढ्याला १७ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शासनाला वचनाची आठवण करून देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी येथे भव्य ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्च्यात हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी ताकतीने सहभागी व्हावे, असे आवाहन धनगर समाजाचे युवक …

Read More »

तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू

जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे  मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान घटनेची माहिती कळताच पशुसंवर्धन  विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत पडलेल्या …

Read More »

14 हजार 234 ग्रामपंचायती प्रशासकाविना:ग्रामपंचायतींचा कारभार रामभरोसे

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपली. मात्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात कसलाही आदेश काढला नसल्याने प्रशासनदेखील हतबल झाले असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना शासन निर्णय येईना…प्रशासन निर्णय घेईना अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील 27 हजार 968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 रोजी संपल्यानंतर सरपंच परिषद व इतर सरपंच संघटनांनी प्रशासक म्हणून विद्यमान …

Read More »

ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद ….

परभणी, दि. ३ (- सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. मोहिमेअंतर्गत परभणी तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHM) रेशनकार्डवर नौद असलेल्या प्रत्येक सदस्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत …

Read More »

एनसीएमसी कार्डच्या रिचार्जच्या नावाखाली भलतीच लुट

राज्याची लाईफलाइन असलेल्या एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरातील तिकिट दिले जात नाही. प्रवाशांना थेट पूर्ण रक्कम देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे एसटी चालक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत. आता, एनसीएमसी कार्डबाबत आणखी बातमी समोर आली आहे. प्रवशांनी १०० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना पूर्ण पैसे …

Read More »

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जाळ्यात

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या रोड रॉबरी प्रकरणात बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी काल रात्री त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्ग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात किरण गायकवाडचा किती गुन्हा मध्ये सहभाग आहे त्याच्यासोबत कोण कोण साथीदार आहेत याचा तपास …

Read More »

1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल

१ सप्टेंबरपासून एलपीजीचे अनेक नियम बदलणार आहेत. सरकारने लागू केलेल्या नियमांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल. जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींसह अनेक घटकांचा एलपीजीच्या किमतींवर प्रभाव पडेल. याव्यतिरिक्त, गॅसवरील जीएसटी आणि इतर खर्चांचाही परिणाम होऊ शकतो. एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत मूळतः २३ ऑगस्ट होती, परंतु ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक अहवालानुसार, लाखो ग्राहकांनी अद्याप …

Read More »

12 तारखेपर्यंत मुंबईत जा,पण…..मनोज जरांगे यांनी सांगीतली आंदोलनाची दिशा

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख …

Read More »