हिंगोली, दि. ३ : हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यापूर्वी सकाळी ७.४६ वाजता ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य धक्का जाणवला. या दोन्ही घटनांमध्ये प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती व्यवस्थापन …
Read More »मराठवाडा
गंगाखेड बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करा – पणन संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश
गंगाखेड (प्रतिनिधी) – गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत परवानाधारक आडत व्यापारी शेतमालाची बोली-लिलाव पद्धतीने खरेदी न करता थेट खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारीवरून पणन संचालक, पुणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत दि. १९ ऑगस्ट रोजी पणन संचालकांकडे तक्रार देण्यात आली होती. कारवाई न झाल्याने डोंगरी जनपरिषदेने दि. १२ ऑक्टोबरपासून पणन कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दि. …
Read More »गळीत हंगामापूर्वी ऊस दर जाहीर करा, शेतकरी संघर्ष समितीची मागणी
गंगाखेड / परभणी (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत साखर कारखाने सुरू करण्याचे निर्देश दिले असताना अद्यापही उसाचे दर जाहीर न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, परभणीने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन दिले. जी-७ शुगर्स माखणीसह सर्व कारखान्यांना दि. २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ ऑक्टोबरपूर्वी ऊस दर जाहीर करूनच गळीत सुरू करावे, अन्यथा मागील वर्षाप्रमाणे …
Read More »ब्राह्मणवाडा येथे शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या
औंढा नागनाथ,दि 29 (प्रतिनिधी)ः तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी घडली. तानाजी विठोबा मोरे वय 59 असे मयत अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. यंदा खरीप हंगामात दोन महिन्यापासून पावसाने दंडी दिल्याने शेतातील पिकाची अवस्था बिकट झाली व सर्व सोयाबीन डोळ्यासमोर वाळून गेली त्यामुळे सततची नापिकी आणि यंदा हातातून जात असलेले पीक पाहून ते …
Read More »राजेंद्रपेठ गल्लीचा राजा गणेश मंडळातर्फे दिवसभर कांदा-पोह्यांचा महाप्रसाद
गंगाखेड (प्रतिनिधी) – शहरातील राजेंद्रपेठ गल्लीचा राजा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कांदा-पोह्यांच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या या सेवाभावी उपक्रमाचे यंदाचे १४ वे वर्ष असून दि. २५ सप्टेंबर रोजी तब्बल ५ क्विंटल कांदा-पोह्यांचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. राजेंद्रपेठ गल्ली येथील श्री गणपती मंदिरात मंडळाच्या वतीने दरवर्षी श्री गणेशमूर्तीची भक्तिभावाने स्थापना केली जाते. गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध …
Read More »राणी सावरगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गंगाखेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद परभणीचे राणी सावरगाव गटाचे सदस्य सय्यद अल्ताफ यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी गुंजेगाव पॉईंट येथील पांडुरंग फंक्शन हॉलमध्ये आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २९२ व्यक्तींनी नेत्र तपासणी करून घेतली. त्यापैकी ६१ व्यक्तींची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून ५१ जणांना औषधोपचार देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »मसापचा ८३ वा वर्धापनदिन व निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न
हिंगोली,दि 28 मराठवाडा साहित्य परिषदेचा ८३ वा वर्धापनदिन आणि त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी उज्वल इंग्लिश स्कूल येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म सा प चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे (वाशीम) हे होते. मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे,उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके,डॉ. रामचंद्र काळुंखे, …
Read More »मीरा कदम यांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
हिंगोली,दि 28 (प्रतिनिधी) इसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीरा कदम आणि धनराज कदम यांनी तातडीने वाढवे कुटुंबाची भेट घेतली.याच भेटीत मिरा कदम यांनी या कुटुंबातील शरद आणि अंकिता या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची घोषणा केली. सेवासदनच्या माध्यमातून या लेकरांना शिक्षणासाठी बळ देण्याचा प्रयत्न …
Read More »मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत बिघडल्यानंतरही आक्रमक भूमिका घेतली आहे. बीडच्या पाटोद्यामध्ये डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. मला आज जाता आलं नाही, त्यामुळे गुरुवारी उद्या दुपारी 1 वाजता मुंबईकडे निघणार आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मी मेलो तरी हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला. सरकारचा ड्राफ्ट वाचल्यानंतर मराठ्यांना महत्वाचा …
Read More »मोदक, खवा अन् प्रसादावर एफडीएची धाड
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या धडक कारवाईदरम्यान नियमबाह्य कारभार करणाऱ्या अनेक प्रसिद्ध हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात आली असून, राज्यभरातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा आणि बंदी असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. एफडीएच्या पथकाने राज्यभरात कारवाई करत 30 लिटर दूध …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com