परभणी,दि 29 (प्रतिनिधी)ः अतिवृष्टी ग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार ते एक लाख देण्याची मागणीसंभाजी ब्रिगेडने सोमवार दिनांक 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे सरकारने आपली तिजोरी खुली करावी तसेच आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह अधिकारी …
Read More »महाराष्ट्र
बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा….20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची 30 सप्टेंबर 2025 रोजी शेवटची मुदत आहे. मात्र …
Read More »भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पदी समीर जानीमीयाॅं यांची निवड
जिंतूर,दि 29 (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जिंतुर मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिंतुर शहरात युवा नेत्तव समीर जानीमीयाॅं यांच्याकडे जिंतुर मंडळ सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली.माजी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समीर जानीमीयाॅं यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी मंडळ अध्यक्ष विलास भंडारे,गोवींद थिटे,नगरसेवक गोपाल रोकडे, चंद्रकांत बाहीरट,प्रदिप चव्हाण,गणेश कुर्हे, व भाजपा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Read More »नऊ मंडळात पुन्हा अतिवृष्टी…
दिनांक 28 सप्टेंबर 2025 च्या अहवालानुसार तालुका निहाय अतिवृष्टी गंगाखेड तालुका माखणी 74.8. राणीसावरगाव 66 पूर्णा तालुका पूर्णा 69.5 चुडावा 73. कावलगाव 66 पालम तालुका पालम 81.3 चाटोरी 66 बनवस 67.3 पेट शिवनी 126.3
Read More »नमो नेञ संजीवनी स्वास्थ शिबीरात 370 रुग्णांची तपासणी
जिंतूर,दि 28 (प्रतिनिधी)ः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भा.ज.पा. शहर मंडळ तर्फे जिंतूर शहरातील नागरीकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासनी शिबीर आयोजीत करण्यात आले होते या शिबीरात 370 रुग्णांची तपासणी केली या मध्ये 10 रुग्णांचे निदान शस्त्रक्रिया साठी केली पुठील मोफत उपचार साठी रेफर केले या शिबीराचे उदघाटक तुळजाभवानी शुगर कारखाण्याचे अध्यक्ष भवनाताई बोर्डीकर यांनी …
Read More »जवळा रूमणा येथे मंदिरावर पडली विज,खळीसह पाच गावचा संपर्क तुटला
गंगाखेड,दि 27 गंगाखेड तालुक्यातील जवळा रूमणा येथील हनुमान मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी रात्री वीज पडून मंदिराचं नुकसान झाले.शिखरावर असलेल्या 8 मुर्त्या जमिनीवर कोसळल्या अशी माहीती ग्रामस्थांनी दिली. महिनाभरापासून या भागात अतिवृष्टी होत आहे.शुक्रवारी देखील दिवसभर पाऊस झाला. रात्रीच्या वेळेला पावसाचा वेग वाढला रात्री दहा ते एक या दरम्यान मोठा पाऊस झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास देखील जोरदार पावसाला सुरू झाली. दुपारी एक …
Read More »इंद्रायणी देवी दर्शनासाठी महिला भावीकांसाठी मोफत बससेवा,माणिक पोंढे यांचा उपक्रम
परभणी,दि 27 ः नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेत इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी माता-भगिनींची भाविक यात्रा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे पाटील व जयश्री पोंढे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. या मंगलप्रसंगी अंबाबाईचा उदो उदो करत परिसरातील अनेक भगिनींना इंद्रायणी देवीच्या दर्शनाचा योग आला. ही यात्रा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महाराष्ट्राचे युवा नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच …
Read More »ताडकळस ते पालम रस्ता बंद
परभणी,दि 27 धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे ताडकळस ते पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.याआधी देखील तीन दिवस हा रस्ता बंद होता.शनिवारी पहाटे पुन्हा पुलावरुन पणी जात असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.
Read More »नाट्य स्पर्धेत बळीराजा विद्यालयाचा तालुक्यात प्रथम क्रमांक
परभणी,दि 27 ः गगाखेड तालुक्यात दिनांक 25 सप्टेंबर रोजी विज्ञान नाटिका स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तालुकाभरातील अनेक शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जनाबाई विद्यालय गंगाखेड, बळीराजा विद्यालय मरडसगाव, जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी, कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड, अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड आदी शाळांनी आपली नाटिका सादर केली. महाराष्ट्र शासन समग्र शिक्षण अभियानांतर्गत गटसाधन केंद्र व अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »गंगाखेड, पूर्णा,पालम तालुक्यांमध्ये पूरस्थिती भयानक
गंगाखेड ता.27 गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड -पालम तसेच गंगाखेड- राणीसावरगाव रस्ते वाहतूक बंद झाली आहे. गंगाखेड, पूर्णा,पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर होत आहे. पोलीस ठाणे चुडावा हद्दीत पूर्णा ते नांदेड रस्त्यावरील मौजे चुडावा गावाजवळ पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. प्रशासनाने योग्य बंदोबस्त लावला आहे. अधिकारी लक्ष ठेवून आहेत. चुडावा तालुका पूर्णा येथे पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती पुराच्या …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com