04/02/26
Breaking News

महाराष्ट्र

शिक्षक दिनानिमित्त 101 शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सुनिल गायकवाड मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम सेलू / प्रतिनिधी – शिक्षक दिनानिमित्त शहरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ आयोजित शिक्षक दिनानिमित्त गुरूजनांचा सत्कार समारंभ केशवराज बाबासाहेब विद्यालयातील कै.वसंतराव खारकर सभागृहात संपन्न झाला.. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून दीपस्तंभ प्रतिष्ठान चे सेलू तालुका अध्यक्ष माधव लोकुलवार , प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी ,जेष्ठ …

Read More »

फाफो पेरेंटिंग पालकांमध्ये इतकी लोकप्रिय का होत आहे?

आजकाल ‘पेरेंटिंग’च्या जगात अनेक नवीन पद्धती येत आहेत. त्यातलीच एक नवीन आणि खूप लोकप्रिय होणारी पद्धत म्हणजे ‘फाफो पेरेंटिंग’ (Fafo Parenting). या पद्धतीचा सोपा अर्थ असा आहे की, मुलांना प्रत्येक वेळी अडवण्याऐवजी त्यांच्या चुकांचे परिणाम त्यांना स्वतःला अनुभवू द्या, जेणेकरून ते त्यातून शिकतील. या पद्धतीमध्ये पालक मुलांवर सतत लक्ष ठेवतात, पण प्रत्येक गोष्ट स्वतःहून करण्यापासून त्यांना रोखत नाहीत. यामुळे मुले …

Read More »

अजित पवार आणि महिला IPS अधिकारी, काय आहे नेमके प्रकरण

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोन संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे अंजना कृष्णा यांना कठोर शब्दांत सुनावत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कूर्डू गावाशी संबंधित असून, या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. सदर व्हिडिओमुळे …

Read More »

होमिओपॅथी डॉक्टरांसाठी मोठी बातमी…..शासनाचा महत्वाचा निर्णय

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य सरकारने सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश आज जारी केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना मर्यादित स्वरूपात आधुनिक औषधोपचार करण्याचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2014 पासून सुरू असलेल्या …

Read More »

कळगाव येथील विकास कामांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

पूर्णा,ता 04 ः कळगाव येथील विविध कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व  प्रहार जनशक्ती पक्षाने पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायत कळगाव अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस कामे दाखवून निधीचा गैरवापर केलेला आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात …

Read More »

महापालीकेची  प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच,काही भागात  अंशतः बदल.

परभणी ता. 4 महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. जाहीर प्रभाग रचनेत फारसे बदल नाहीत. काही प्रभागाच्या व्याप्ती आणि सीमा रेषेत अंशतः बदल आहेत. उर्वरित बहुतांशी प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहे. पालिका मुख्यालय, नटराज रंग मंदिर व कल्याण मंडपम येथील समिती कार्यालयात प्रभाग रचना. आज नकाशासह झळकावण्यात आली. ती रचना कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वेबसाईट https://pcmcparbhani.org/ …

Read More »

ओबीसींसाठीही उपसमिती गठीत

मराठा आरक्षणासाठी मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार आता ओबीसींसाठीही महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येणार असून चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष असतील. या उपसमितीत छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह एकूण आठ मंत्री असणार आहेत. राज्य सरकारने नुकतेच मराठा आरक्षणासंबंधी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात ओबीसी नेत्यांनी आवाज उठवला. राज्याचे मंत्री छगन …

Read More »

एसबीआयची ‘या’ दिवशी मोबाईल बँकिंग सेवा राहणार बंद

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. याचा बँकेच्या 44 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे. किती वाजता आणि किती तासांसाठी एसबीआयची ही सेवा बंद राहणार आणि ग्राहकांसाठी या काळात पर्याय काय …

Read More »

एनसीसी कॅडेटनी अनुशासित होऊन देशसेवेसाठी सज्ज राहावे-ग्रुप कमांडर ब्रिग्रेडियर अनुप बरबरे यांचे प्रतिपादन

परभणी,दि 03 ः राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना अनुशासन, शिस्त, देशसेवा आणि देशप्रेम शिकवले जाते. कॅडेटनी याचा फायदा घेत अनुशासित व्हावे आणि देशसेवेसाठी सज्ज राहावे असे आवाहन एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिग्रेडियर अनुप बरबरे यांनी मंगळवारी (दि.०२) रोजी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे परीक्षण करण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी कमांडिंग ऑफिसर के दिलीप रेड्डी, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य …

Read More »

४ सप्टेंबरला ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन

पाथरी प्रतिनिधी – ओबीसी आरक्षणात इतर समाजाचा समावेश करून होत असलेली घुसखोरी रोखावी, या मागणीसाठी पाथरी तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी हजारोच्या संख्येने मान्यवर ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले. सरकारने मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश न करण्याची ठाम भूमिका घ्यावी, …

Read More »