पाथरी प्रतिनिधी पाथरीतील आठवडी बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्याची मागणी; नगर परिषद सदस्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन पाथरी (प्रतिनिधी):पाथरी शहरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार’ कोणत्याही अधिकृत ठरावाशिवाय जुन्या, अपुऱ्या जागेत हलवण्यात आल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा बाजार पुन्हा त्याच्या मूळ जागेवर भरवण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषदेच्या अनेक सदस्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांना निवेदन …
Read More »मराठवाडा
भारतीय संविधान समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – उत्तम कांबळे
सेलू ( प्रतिनिधी ) संविधान संघर्षाचा विषय आहे. संघर्षातून नवीन जग निर्माण होते. संविधानाने पराभूत माणसांचा इतिहास बदलून विजेत्या माणसांचा इतिहास रचला. भारतीय संविधाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. भारतीय संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार आहे. समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे ( नाशिक ) यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक …
Read More »संकल्प मानव विकास संस्थेची शासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
रमेश बिजुले पाथरी,दि 21 येथील हॉटेल प्रियल येथे आज दिनांक २१ एप्रिल रोजी संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक संपन्न झाली. संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकरराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न, महिला-बाल आरोग्य आणि कामगारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. …
Read More »पिक विम्यासाठी कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा.
सेलू दि १७ आज दि.17/4/2026रोजी तालुका कृषी अधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेखरिप २०२५ च्या पिक विम्यातून कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा, वालूर महसूल मंडळ वगळल्यात आले आहे . याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन बेमुद्दत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे . २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी अतिवृष्टी पाऊस झालेला होता तसेच दूधना नदी, कसूरा नदी, करपरावर नाल्याच्या …
Read More »म.बसवेश्वर जयंती साजरी करण्याची शिवा संघटनेची मागणी
सेलू ( प्रतिनिधी ) मध्ययुगीन काळातील महान संत समता नायक , विरशैव धर्मप्रसारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासन निर्णया प्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी अशी मागणी शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सेलू यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ना.तहसिलदार कृष्णा देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की १९ एप्रिल रविवार रोजी अक्षयत्रतियेच्या …
Read More »श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्या निमित सेलूत शिबिरात ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
सेलू ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत येथील महेशनगर मधील श्री स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९ते १५ एप्रिल दरम्यान गुरु चरित्र पारायण व नाम जप यज्ञाचे आयोजन करण्यात आले . ७ एप्रिल मंगळवार रोजी श्रीची पालखी काढून नगर …
Read More »गोवंश जनावरांची वाहतूक करणारी आठ वाहने सेलू पोलिसांनी पकडली
सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील रायगड कॉर्नर या ठिकाणी दि १६ एप्रिल रोजी पहाटे पाच च्या सुमारास अवैधरित्या गोवंश जनावरे वाहतूक करीत असताना एकूण सात पिकप आणि एक आयशर अशी वाहने मिळून आल्याने त्यावरील चालकांविरोधात सेलू पोलीस स्टेशन येथे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण अकरा आरोपी असून सदर गुन्ह्यामध्ये बैल जातीचे गोवंश ४५ जनावरे जप्त करण्यात …
Read More »एसटीच्या तिकीट दरांत भरमसाठ वाढ,सफाई खर्चाचा बोजा प्रवाशांवर
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी तिकीट दरात 10 टक्क्यांची हंगामी वाढ जाहीर केली असून, प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त 2 रुपयांचा स्वच्छता अधिभारही लागू केला आहे. या निर्णयामुळे गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल-मे महिन्यात शाळा आणि …
Read More »सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू दि१२ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या संकल्पनेतील महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेस तालुक्यातील १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते पदव्युत्तर या तीन गटात शहरातील नूतन विद्यालयात रविवार ( दि. १२) …
Read More »सेलू येथे डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेची प्रॅक्टिकल परीक्षा उत्साहात संपन्न
सेलू दि १२ कल्याणम् एज्युकेशन सोसायटी, परभणी यांच्या वतीने आयोजित डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा (शैक्षणिक वर्ष 2025–26) अंतर्गत सेकंड लेव्हल प्रॅक्टिकल परीक्षा आज दिनांक १२ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू येथील सायन्स लायब्ररीमध्ये उत्साहात संपन्न झाली. या परीक्षेस प्रथम स्तरावर पात्र ठरलेल्या १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर करत आपली …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com