24/06/26
Breaking News

एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे सदस्य म्हणून नगरसेवक अयुब पठाण यांची निवड

कळमनुरी : लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीवर सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अयुब खान पठाण यांची नियुक्ती पत्र सार्वजनिक आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे स्वाक्षरीने नियुक्तीपत्र काढण्यात आले हे नियुक्तीपत्र डॉ. विकास थोरात यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील “जन आरोग्य समिती” तसेच रुग्णालयातील “रुग्ण कल्याण समिती” यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाणी गुणवत्ता, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.
नागरिकांचा सहभाग वाढवून आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख व परिणामकारक करण्यासाठी समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी नगरसेवक अयुब खान पठाण यांनी सक्रिय सहकार्य करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावरील आरोग्य सुविधा बळकट होण्यास मदत होणार असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …