हिंगोली,दि 22 (प्रतिनिधी)ः
गटनेते श्रीराम बांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक श्यामभाऊ कदम यांच्या हस्ते यशोदा नगर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. यामध्ये रस्ते व इतर मूलभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगरसेवक श्यामभाऊ कदम यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत पावसाळ्यापूर्वी योशोदा नगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर प्राधान्याने लक्ष देत विकासकामांना गती देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जनतेने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत प्रभागातील प्रत्येक विकासकाम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यात येईल,” असे प्रतिपादन श्यामभाऊ कदम यांनी केले. भूमिपूजन प्रसंगी स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या विकासकामांचे स्वागत करत नगरसेवक श्यामभाऊ कदम यांच्या कार्याचे कौतुक केले.”दिलेला शब्द, केलेली कृती; प्रभाग क्रमांक १६ च्या विकासासाठी नगरसेवक श्यामभाऊ कदम कायम कटिबद्ध!”
Shabdraj www.shabdraj.com