23/06/26
Breaking News

डी पी प्लॅन मधील आरक्षण रद्द करण्याचा मागणीसाठी शेतकरी कुटुंबाचे बेमुदत धरणे आंदोलन

सेलू,दि 22 ( प्रतिनिधी )
सेलू नगर परिषद जी परभणी सर्व्हे नंबर २० मधील प्ले ग्राउंड EP- 29 हे आरक्षण तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी संबधीत शेतकरी कुटूंबाने दि ५ जून पासून संघर्ष सुरू केला असून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे .
सेलू नगर परिषद शिवारात सर्व्हे क्रमांक २० मध्ये ७ एकर २४ गुंठे जमीन राम किशन दगडोबा शेरे व कुमुदिनी रामकिशन शेरे यांच्या मालकीची व ताब्यातील आहे .
त्यांच्या कुटूंबात लहान मोठी एकूण ११ व्यक्ती असून कोणीही शासकीय सेवेत नसून संपूर्ण कुटूंबाचा उदर निर्वाह या जमिनीवरच आहे .
रामकिशन शेरे व कुमुदिनी शेरे हे दोघेही जेष्ठ नागरिक असून व्याधीग्रस्त आहेत .
सदरील जमीन शहरालगत असून गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील मोकाट जनावरांच्या त्रासात व धोक्यात आहे .त्यामुळे सदरील जमीन विकसित करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही .
परंतु गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डी पी प्लॅन मध्ये असलेले इतर ठिकाणचे प्लेग्राऊंड रद्द करून हेतुपुरसर हे आमच्या जमिनीवर प्ले ग्राउंड चे आरक्षण टाकून आमच्यावर घोर अन्याय केला जात आहे .
तरी सदरील आरक्षण तात्काळ डिलीट व रद्द करून आम्हाला ले आउट साठी लेखी पत्र द्यावे,जेणे करून आमच्या जमिनीचा विकास करून माझ्या कुटूंबाचा व्यवस्थित उदर निर्वाह करू शकतोल या निवेदनावर रामकिशन शेरे व कुमुदिनी शेरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …