14/07/26
Breaking News

नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा,स्वाभीमानीची मागणी

परभणी,दि 18 ः
परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या पाऊसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची सोमवार दि.158 रोजी भेट घेऊन केली आहे.

संपुर्ण परभणी जिल्ह्यात तसेच पूर्णा तालुक्यात ढग फुटी झाल्याने गोदावरी नदीत जाणार्या ऊपनदी, ओढे, नाले यांना पुर आला हे सर्व पाणी गोदावरी नदीत जाते परंतु गोदावरी नदीला आलेल्या पुराने हे पाणी नदीत न गेल्याने आजूबाजूला पसरत गेले त्यामुळे पाण्याची व्याप्ती वाढत तीन-चार किलो मिटर पर्यंत पाणी पसरले त्यामुळे लिमला, माहेर, बाणेगाव, कळगाव, धानोरा, मुंबर, गोळेगाव, देऊळगाव, देवठाना, वझुर, खरबडा, दगडवाडी, बाम्हणी, दस्तापूर, मजलापुर, इटलापुर माळी, फुलकळस यान गावातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन संपुर्ण पिके उदवस्त झाली आहेत. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील बऱ्याच मंडळातील आहे. ह्या जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महतेचा जिल्हा म्हणुन आहे त्यातच राज्य सरकारने पीक विमा योजनेत यावर्षी केलेले बदल व राज्य सरकारने सुद्धा नुकसानीच्या अनुदानात बदल केले आहेत. सरकारच्या या धोरणानमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महतेत नकीच वाढ होणार असे चित्र दिसते. हे जर थांबवावे असे जर राज्य सरकारला वाटेत असेल तर त्यांनी नुकसान ग्रस्तांचे दोन दिवसात पंचनामे करून त्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत तात्काळ जाहीर करावी. ज्याची जनावरे या पुरात वाहुन गेलीत किंवा मरण पावलीत त्यांना सुद्धा तात्काळ मदत करण्यात यावीत. तसेच राज्य सरकारने पीक विमाच्या निकषात केलेले बदल तात्काळ रद्द करून केंद्र सरकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना जश्यास तशी लागु करण्यात यावी. व पीक विमा कंपनी कडे जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पीक विमा कंपनीला देण्यात यावे. जेणे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी बद्दल त्यांना थोडाफार दिलासा मिळेल त्यातून त्यांचा संसाराचा गाडा चालेल.
जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत जर मदत मिळाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संघटना राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन ऊभे करणार याची नोंद घ्यावी. यावेळी माझ्यासह
रामप्रसाद गमे, गजानन तुरे, दिगंबर पवार, मुंजा लोडे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, मारोती पवार, नर्सिंग पवार, विष्णू शिंदे, मुजाभाऊ कुकर, कृष्णा शिंदे, मोतीराम पौळ, बाळासाहेब पवार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Check Also

हिंगोली जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न!

​१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी …