17/07/26
Breaking News

पर्यावरण संवर्धनासाठी जिंतुर शहर मंडळाचा पुढाकार; १०१ वृक्षांचे रोपण

जिंतूर/ प्रतिनिधी
 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या पर्यावरणविषयक जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत जिंतुर शहर मंडळाच्या वतीने येथील क्रीडा संकुल परिसरात १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

मा. ना. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचे केलेले आवाहन लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि हरित क्षेत्रांचे घटते प्रमाण या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणासारख्या उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख, गटनेते मुन्ना भैय्या गौरे, उपाध्यक्ष मोहसीन खान, नगरसेवक किशोर जाधव, असेफ खान, मंडळ अध्यक्ष विलास भंडारे, संयोजक समीर जानिमिया, बंटी जाधव, विजय जाधव, राजेश राठोड, शाहरुख सर, ताठे, सय्यद नसीर, संगेकर अप्पा यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. हरित जिंतुरच्या दिशेने टाकलेले हे पाऊल पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला बळ देणारे ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …