पाथरी,दि 08
परभणीतीलएका नामांकित बँकेतील खात्यामधून सहा लाखाहून अधिकची रक्कम ऑनलाईन परस्पर काढून घेतल्याने फसवणूक झाल्याचे म्हणून सदरील बँकेच्या विरोधात पाथरी शहरातील एका खातेधारकाने परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
अनीस खान युनूस खान पठाण (रा. आझाद नगर, पाथरी) असे फसवणुक झालेल्या खातेदाराचे नाव असून त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार ३ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान त्यांच्या खात्यातून सुमारे ६ लाख २ हजार ९९९ रुपये ऑनलाइन फसवणुकीद्वारे काढण्यात आले. याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र परभणीतील एचडीएफसी बँकेने २७ जानेवारी २०२६ रोजी जबाबदारी नाकारत परतावा देण्यास नकार दिला.
कर्ज मंजुरी प्रक्रियेदरम्यान मोबाईलवरील ओटीपी प्रक्रिया बँकेतच पार पडली आणि त्यानंतरच संशयास्पद व्यवहार सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अनधिकृत ईमेल आयडी व गूगल पे अॅपच्या माध्यामातून फसवणूक झाल्याचेही त्यांनी नमूद केले. ग्राहक संरक्षण कायदाव रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत त्यांनी न्याय मिळावा तसेच रक्कम परत मिळावी अशी मागणी केली आहे. दरम्यान मंगळवार ७एप्रिल पासून त्यांनी परभणीत उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास बैंक प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Shabdraj www.shabdraj.com