23/08/26
Breaking News

विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा -करुणा कुलकर्णी

सेलू/प्रतिनिधी
विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे.शिक्षक हा दुसरा पालक असतो.समाज व देश घडविणारी पिढी तयार करण्यात शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका असते.विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करत असतात.शिक्षकांचे अध्यापन किती प्रभावी व यशस्वी झाले याची पावती विद्यार्थ्यांच्या प्रगतीत असते म्हणूनच विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा आहेत असे प्रतिपादन शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना केले.
व्यासपीठावर कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर ,मुख्याध्यापक शंकर शितोळे ,अनिल कौसडीकर ,शंकर राऊत यांची उपस्थिती होती.शिक्षकदिनाचे औचित्य साधत विद्यालयातर्फे शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भाषणातून शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले. मानस सरोवर यात्रा पूर्ण करून आलेल्या बालवाडी ताई सीमा आष्टीकर यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांनी आपल्या मनोगतात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शिक्षकांनी अध्यापन प्रगल्भ करावे असा विचार व्यक्त केला.शिक्षक प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारा ऊर्जास्तोत आहेत नैतिक मूल्य रुजवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे ,राष्ट्र उभारणीचा पाया शिक्षक तयार करतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल गायकवाड ,पद्य गजानन साळवे ,आभार विजय चौधरी यांनी मानले.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …