18/07/26
Breaking News

डिग्रस कऱ्हाळे येथे जिओची रेंज नसल्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

 

हिंगोली,दि 08 ः
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे गेल्या अनेक महिन्यापासून जिओ टावर ला अजिबात नेटवर्क नसल्यामुळे डिग्रस कऱ्हाळे येथील ग्रामस्थ वैतागले असून दिनांक 11 जून रोजी हिंगोली औंढा रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार शिवाजी कऱ्हाळे यांनी केला आहे.
हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथे जिओ टावर ची रेंज गेल्या चार ते पाच महिन्यापासून अजिबात व्यवस्थित चालत नाही त्यामुळे अनेकांचे व्यवहार शालेय विद्यार्थिनी शिक्षण यामुळे फार मोठे नुकसान होत आहे संबंधित टावर वाल्यांनी जर नेटवर्क व्यवस्थित नाही केले तर 11 जून रोजी हिंगोली औंढा रोडवर पत्रकार शिवाजी कऱ्हाळे यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

 

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …