17/07/26
Breaking News

पिक विम्यासाठी कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा.

सेलू दि १७
आज दि.17/4/2026रोजी तालुका कृषी अधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेखरिप २०२५ च्या पिक विम्यातून कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा, वालूर महसूल मंडळ वगळल्यात आले आहे . याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन बेमुद्दत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे .

२०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी अतिवृष्टी पाऊस झालेला होता तसेच दूधना नदी, कसूरा नदी, करपरावर नाल्याच्या लगत शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून जमीन खरडून गेल्या होत्या व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते .
कुपटा, वालुर, मोरेगाव, चिकलठाणा ही मंडळे नदी पात्राच्या लगतची गावी असून कापणी प्रयोग संयुक्त अहवालातून गटविकास अधिकारी महसूल विभाग कृषी विभाग विमा प्रतिनिधी व आपल्या कार्यालयाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित राहावे लागत आहे तरी आपणास विनंती की आपण या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन खरीप २०२५ च्या पिक विमा वरील मंडळाचा समावेश करून सर्व शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ द्यावा नसता शेतकऱ्याच्या वतीने मागण्या मान्य न झाल्यास २६ एप्रिल रोजी कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जयसिंग शेळके,
दगडोबा जोगदंड महाराज,
शिवहरी शेवाळे, विजय काष्टे, उद्धवराव मोरे, महेश नावडे, गोपीनाथ सोळंके, कंस मानमोडे ,दिगंबर बुधवंत, रमेश शिंदे, जगन शिंदे, सुनील मुळे, प्रल्हाद तुरे, काशिनाथ सोळंके, भीमराव हरके, मंचक सोळंके, विष्णूपंत सोळंके, सुनील गायकवाड, विशाल गायकवाड व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …