पंजाबी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनम बाजवा सध्या तिच्या ‘बागी ४’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि संजय दत्तसोबत काम करत तिने चाहत्यांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे. आता ती आणखी एका मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनली आहे – ‘बॉर्डर २’.
‘बॉर्डर २’ हा १९९७ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे. या बहुचर्चित चित्रपटात सोनम बाजवा सनी देओल आणि दिलजीत दोसांझसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्माता निधी दत्ता यांनी नुकतेच सोशल मीडियावर सोनमचे फोटो शेअर करत तिचे टीममध्ये स्वागत केले.

दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी याआधीही ‘पंजाब १९८४’, ‘सरदारजी २’, ‘सुपर सिंग’ आणि ‘हौसला राख’ या चित्रपटांमध्ये पाहिली आहे. त्यामुळे ‘बॉर्डर २’ मध्ये हे जोडीदार पुन्हा एकत्र पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांच्याबरोबर वरुण धवन, अहान शेट्टी, आणि मेधा राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करत असून निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे. पी. दत्ता आणि निधी दत्ता यांनी केली आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण पूर्ण झाले असून, तो २२ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षकांना आता या मल्टीस्टारर युद्धपटाची आतुरता लागली आहे.
Shabdraj www.shabdraj.com