04/02/26
Breaking News

वाखरीत चार जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा

सदाशिव पोरे
पंढरपूर.दि 28 जवाहरलाल शिक्षण प्रसारक विश्वस्त मंडळ, पंढरपूर संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा भव्य माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शाळेत आयोजित केल्याची माहिती प्राचार्य मोहन क्षीरसागर यांनी दिली.त्याचवेळी संस्थेचे अध्यक्ष स्व. आबासाहेब सोनवणे यांची प्रथम पुण्यतिथी असून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला जाणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगोला तालुक्याचे मा. आमदार बाबासाहेब देशमुख हे उपस्थित असतील तर प्रमुख पाहुणे ह.भ.प.प्रा. तुकाराम सुतार असतील अशी माहिती प्राचार्य क्षीरसागर सर यांनी दिली.
या मेळाव्यासाठी विविध वर्षांतून शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे.मेळाव्याची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार असून दीपप्रज्वलन, स्वागतपर भाषण आणि मान्यवरांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम नियोजित आहेत. यावेळी माजी विद्यार्थी आपल्या आठवणींना उजाळा देणार असून सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर मनोगतही होणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, माजी शिक्षकांचा सत्कार आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने होणार आहे.

Check Also

बारामती रन वेवर जाऊन शरद पवारांनी घेतली माहिती, मन हेलावणारे दृश्य

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये …