09/05/26
Breaking News

महाराष्ट्राचे लाडके अजित दादा पवार पंचत्वात विलीन,लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप

महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते.

पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लोकही अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. काल रात्री उशिरा बारामतीत लोक येऊ लागले. सकाळी अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. समर्थक दुचाकी, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बसेसमधून आले. अंत्ययात्रा एक ते दोन किलोमीटरपर्यंत पसरली.

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

बारामती येथे बुधवारी सकाळी 8.46 वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वर्षे 6 महिने 6 दिवस) यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव होते. त्यातील एकही जण वाचू शकला नाही.

Check Also

सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी सह्या न करणारे ‘ते’ आमदार कोण?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी हालचाल सुरू झाली होती. …