उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीच्या वाटेवर भक्तिभावाने चालणाऱ्या वारकऱ्यांसोबत “भक्तीयोग २०२५” हा विशेष उपक्रम भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. “भक्तीयोग २०२५” हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम पाटील, विद्यार्थी विकास कक्षाच्या विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योति ढाणके व त्यांची कन्या कु. अंकिता ढाणके, तसेच शिक्षक समन्वयक श्री. किरण जाधव, सौ. कुमकुम बाला, सौ. प्रियंका टाकळकर, सौ. श्रुती गुंजोटीकर, सौ. उर्वशी भट, कु. अश्विनी भापकर, सौ. शुभांगी सातव, श्री. प्रविण देशमुख आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. शुभम कोले, श्री. युवराज नलवडे यांच्यासह स्वयंसेवक विद्यार्थी — मिहीर शेलार, संदेश वडागळे, प्रसाद वारूंज, ओम जाधव, गिरीश सातव, यश येनपुरे, प्रज्वल सातव, राज घाडगे, अर्जुन गायकवाड, हर्षवर्धन माने, संकेत मरकड, अथर्व कोलते, प्रीती काळे, आर्य क्षीरसागर, मोहनिश बिडकर, महक वधवानी, हिमांशू हांडे, मधुश्री वारके, सृष्टी भोसले, सुवोध ढांडे, कृष्णा ठोबंरे आणि संगमेश स्वामी — यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे व भक्तिभावाने सहभाग घेतला व कार्यक्रमाचा आनंद लुटला.
विविध भागांतील दहा दिंड्यांमधून “भक्तीयोग” कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. योगसाधनेसोबतच भजन, कीर्तन, पाऊली, फुगड्या यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांमध्ये वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व जण प्रेममय व भक्तिमय वातावरणात रंगून गेले.
पंढरपूर दिंडीचा पुणे मुक्काम आणि आंतरराष्ट्रीय योग दिन असा एक दुग्धशर्करा योग जुळून आला होता. या सुवर्णसंधीचे औचित्य साधून मा. चंद्रकांतदादा, मा. राजेश पांडे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, रासेयो संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी आणि इतर अनेक मान्यवरांच्या पुढाकाराने हा अत्यंत देखणा आणि प्रेरणादायी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. आम्हा सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले, ही खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
आपल्या महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध कार्यक्रमांना कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम साहेब, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम सर (भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी) आणि सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव सर यांचे आशिर्वादरूप मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभत आहे.
Shabdraj www.shabdraj.com